कुर्ला एलबीएस रोडवर तरुणाचा थरारक अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कुर्ला परिसरात बेस्ट बस आणि दुचाकीचा अपघात झाले आहे. कुर्ला येथील एलबीएस रोडवर शुक्रवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास बेस्ट बसने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातात शाहिद शेख (वय 26) हा तरुण जखमी झाला आहे.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने जखमी शाहिद शेख याला कुर्ला येथील फौजिया रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. अपघात इतका अचानक घडल्याने काही काळ एलबीएस रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
advertisement
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त दुचाकी आणि बेस्ट बस बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी बेस्ट बस चालक पवनकुमार ओझा याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.
या अपघातानंतर परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान अपघाताचे नेमके कारण काय?,बस वेगात होती का? तसेच दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले होते का? याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
