कोलाबा येथील बेस्ट कार्यालयात आयोजित समारंभात 12 मीटर लांबीच्या 4 संपूर्णपणे इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक आशिष शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. मुंबईत 250 इलेक्ट्रिक बस सुरू करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा हा प्रारंभ असून, शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नव्या उंचीवर नेण्याबरोबरच कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी हे निर्णायक पाऊल ठरणार आहे.
advertisement
मध्य आणि पश्चिम रेल्वेची गर्दी होणार कमी! गेमचेंजर ठरणार कॉरिडॉर; कसा आहे प्लान
कशी आहे इलेक्ट्रिक बस?
नव्या इलेक्ट्रिक बस या ओशिवरा डेपोमधून कार्यरत राहतील. या बसची निवड प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच सर्वाधिक मागणी असलेल्या मार्गांना सेवा पुरवण्यासाठी करण्यात आली आहे. पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटीने डिझाइन व निर्मिती केलेल्या 12 मीटर लांबीच्या बस खास आहेत. प्रत्येक बसमध्ये चालकासह 36 प्रवाशांसाठी आसनव्यवस्था असून, व्हीलचेअर प्रवेशाची सुविधा तसेच अधिक लवचिकतेसाठी 3 फोल्डेबल (घडीच्या) आसनांची व्यवस्था आहे.
बसच्या खास 400 मिमी उंचीच्या लो-फ्लोअर डिझाइनमुळे बसमध्ये चढणे-उतरणे अधिक सुलभ झाले आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांसाठी हा प्रवास अधिक सोयीस्कर ठरणार आहे. 366.66 केडब्ल्यूएच क्षमतेच्या एलएफपी बॅटरीसह सुसज्ज या बस एका चार्जवर 250 किमीपर्यंतचा प्रवास करू शकतात. त्यामुळे त्या मुंबईच्या दैनंदिन शहरी मार्गांसाठी आदर्श ठरतात. पीएमएसएम मोटर प्रणाली प्रवासाला अधिक सुरळीत आणि कार्यक्षम बनवत असून बसमधील अत्याधुनिक सुविधा प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी अनुभव देतात.
मुंबईच्या हरित भविष्यासाठी कटिबद्ध
“मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीच्या प्रगत आणि दूरदृष्टीपूर्ण ध्येयात भागीदार होण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही बेस्टचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. या लोकार्पणातून शाश्वत गतिशीलतेप्रती शहराची ठाम वचनबद्धता अधोरेखित होते. या प्रवासात आपला सहभाग नोंदविण्याचा आम्हाला अभिमान असून, आगामी काळात मुंबईच्या हरित आणि स्वच्छ भविष्यासाठी सातत्याने योगदान देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत,” असे पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटीच्या सीईओ डॉ. आंचल जैन म्हणाल्या.
पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी आज भारतातील शाश्वत सार्वजनिक वाहतुकीच्या क्षेत्रात नवे मानदंड प्रस्थापित करत आहे. सध्या कंपनीची उपस्थिती देशातील 31 शहरांमध्ये असून, 2700 हून अधिक ई-बस विविध महत्त्वपूर्ण प्रदेशांमध्ये यशस्वीरीत्या तैनात करण्यात आल्या आहेत. उत्तर भारतातील लडाख, हिमाचल प्रदेश, दिल्ली आणि उत्तर प्रदेशपासून, पूर्वेकडील पश्चिम बंगाल व ओडिशा, दक्षिणेतील केरळ आणि पश्चिमेकडील गुजरात, महाराष्ट्र व गोवा या राज्यांपर्यंत कंपनीने आपला ठसा उमटवला आहे. या विस्तारामुळे देशभर शाश्वत, पर्यावरणपूरक आणि भविष्याभिमुख सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा मिळत आहे