TRENDING:

BEST : मुंबईकरांसाठी गुड न्यूज; वीकेंडला बेस्टच्या जादा बस 'या' मार्गांवरून धावणार

Last Updated:

BEST Extra Buses : शनिवार आणि रविवारी बेस्टच्या जादा बस मुंबई शहरात धावणार आहे. नेमक्या कोणत्या भागातील प्रवाशांना फायदा होणार आहे आणि यामागील कारण काय ते जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : रमजान ईजनिमित्ताने बेस्टने एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. शहरातील विविध भागात रमजान ईद आणि बासी ईदनिमित्ताने होणारी गर्दी लक्षात घेऊन जादा बस चालविण्यात येणार आहे; मात्र या बसेस शहरातील कोणत्या भागातून असतील आणि किती असतील त्याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या.
रमजान ईदनिमित्त बेस्टच्या १५० जादा बस
रमजान ईदनिमित्त बेस्टच्या १५० जादा बस
advertisement

कुठल्या मार्गावरून धावणार जादा बस

रमजान ईद ही शनिवारी आणि बासी ईद रविवारी साजरी करण्यात येणार आहे.या दोन्ही दिवशी 150 जादा बेस्ट बस शहरातील विविध मार्गावर चालविण्यात येणार आहेत. ज्या बासी ईदनिमित्ताने गेट-वे-ऑफ इंडिया, डॉ.श्यामाप्रसादमुखर्जी चौक तसेच वीर माता जिजाबाई भोसेल प्राणी संग्रहालय, मोहम्द अलीमार्ग, हाजीअली, शिवाजीनगर, माहीम, वांद्रे बॅन्ड स्टॅन्ड, जुहू चौपाटी या ठिकाणी चालवण्यात येणार आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात मोठी उसळी, कांद्याने केली आजही निराशा, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

या सर्व शहरातील 25 आगारांतून जादा बेस्ट बस धावणार आहे शिवाय प्रवाशांच्या मदतीसाठी जास्त गर्दी असलेल्या बसथांब्यावर बस निरीक्षक आणि वाहतूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. या सर्व जादा बेस्ट बसेसचा प्रवाशांनी जास्तीत जास्त लाभा घ्यावा असे आवाहन बेस्ट उपक्रमाने केलेले आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
BEST : मुंबईकरांसाठी गुड न्यूज; वीकेंडला बेस्टच्या जादा बस 'या' मार्गांवरून धावणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल