भास्कर जाधव यांचे चिरंजीव विक्रांत जाधव यांची गुहागर मतदारसंघातून विधानसभा लढण्याची इच्छा आहे. गत पंचवार्षिक विधानसभेवेळी प्रयत्न करूनही त्यांना उमेदवारी मिळालेली नव्हती. यंदाच्या साली काहीही करून विधानसभा लढायची, असाच त्यांना प्रण आहे. त्यामुळे अजित पवार यांच्याशी झालेल्या भेटीचे राजकीय वर्तुळात विविध अर्थ काढले जात आहे.
मैं खुशनसीब हूँ मुझे बाबासाहब मिल गए, मैं इन्सान बन गया, मुख्यमंत्र्यांचा शायराना अंदाज
advertisement
'वेगळे अर्थ काढू नका, भेट केवळ कौटुंबिक!'
दुसरीकडे आमची भेट केवळ कौटुंबिक असून त्यामागे कोणताही राजकीय हेतू नाही, असे सांगताना उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शहरात आल्यामुळे त्यांचे स्वागत करणे ही आमची संस्कृती असल्याचे आवर्जून विक्रांत जाधव यांनी सांगितले.
भास्कर जाधव यांनी मेळाव्यातून ठाकरेंच्या कार्यप्रणालीवर उघड नाराजी व्यक्त केली होती
अजित पवार यांची भेट घेऊन विक्रांत जाधव आणि भास्कर जाधव यांचे पक्षावर दबावचंत्र टाकण्याचे प्रयत्न असल्याचीही चर्चा आहे. मागील काही महिन्यांपूर्वी भास्कर जाधव यांनी मेळावा घेऊन "मला काही सांगायचे आहे.." असे म्हणत मनातील खदखद कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली होती. राष्ट्रवादीत असताना मंत्री होतो तरीही शिवसेनेने मला मंत्रिपदाची संधी नाही, याचे शल्य बोचत असल्याचे त्यांनी सांगितले होते. यानिमित्ताने त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर एकप्रकारे जाहीररित्या नाराजी व्यक्त केली होती.
लेकाला गुहागर मतदारसंघातून उमेदवारी मिळवून देणे, हे भास्कर जाधव यांचे लक्ष्य
अजित पवार यांची घेतलेली भेट ही आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी वापरलेले दबाव तंत्र असल्याचे बोलले जात आहे. भास्कर जाधव यांना चिपळूण तर मुलगा विक्रांत जाधव यांना गुहागरमधून उमेदवारी मिळावी, असा त्यांचा प्रयत्न आहे. चिरंजीव विक्रांत यांना गुहागर मतदारसंघातून उमेदवारी मिळवून देणे, हे भास्कर जाधव यांचे टार्गेट आहे. त्यादृष्टीने त्यांनी आत्तापासून मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
