मैं खुशनसीब हूँ मुझे बाबासाहब मिल गए, मैं इन्सान बन गया, मुख्यमंत्र्यांचा शायराना अंदाज
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Buddhist Tradition Varshavas: बौद्ध धर्मातील अत्यंत महत्त्वाच्या 'वर्षावासा'च्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भंतेजींना चिवरदान, भोजनदान आणि धम्मदान झाले.
मुंबई : भिख्खू संघाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला वर्षावास कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी संपन्न झाला. या कार्यक्रमानंतर तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्या जीवनातील महत्व मुख्यमंत्र्यांनी शायराना अंदाजात अधोरेखित केले. दौलत मिल गयी जिसको वो धनवान बन गया... ताकद मिल गयी जिसको वो बलवान हो गया... मैं खुशनसीब हूँ मुझे बाबासाहब मिल गए, मैं इन्सान बन गया... असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच जगात आज अनेक ठिकाणी संघर्ष आणि युद्धाची परिस्थिती असताना जगाला युद्ध नको बुद्ध हवाय, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
बौद्ध धर्मातील अत्यंत महत्त्वाच्या 'वर्षावासा'च्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भंतेजींना चिवरदान, भोजनदान आणि धम्मदान झाले. 'वर्षा'वर बुद्धवंदनेची मंगलमय सुराटवट देखील ऐकायला मिळाली. 'वर्षा'वर असा कार्यक्रम पहिल्यांदाच होत असल्याचे भंतेजींनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. असा कार्यक्रम प्रथम होतो आहे आणि मी मुख्यमंत्री असताना होत आहे हे ऐकून मलाही भारी वाटल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
advertisement
बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीनुसार राज्य शिक्षणाच्या बाबतीत अग्रेसर करायचे आहे
बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिकवणीनुसार आपल्याला आपले राज्य शिक्षणाच्या बाबतीत अग्रेसर करायचे आहे. गोरगरीब, महिला, शेतकरी यांच्या आयुष्यात सुखासमाधानाचे दिवस येतायेत. विविध योजनांच्या माध्यमातून मला जनतेची सेवा करायली मिळते आहे. विकास करताना लोककल्याणकारी योजनांची सांगड घालतोय, याचा मला आनंद आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
advertisement
मैं खुशनसीब हूँ मुझे बाबासाहब मिल गए, मैं इन्सान बन गया
ये देश नहीं चलता गोलियों की बौछार से.. ये देश चलता हैं बाबासाहेब की संविधान से... असे म्हणत बाबासाहेब मला मिळाल्याने मी खऱ्या अर्थाने माणूस झाल्याचे त्यांनी शायरीतून सांगितले. ते म्हणाले, "दौलत मिल गयी जिसको वो धनवान बन गया... ताकद मिल गयी जिसको वो बलवान हो गया... मैं खुशनसीब हूँ मुझे बाबासाहब मिल गए, मैं इन्सान बन गया..."
advertisement
ऑल इंडिया भिक्षू महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष भदंत डॉ. उपगुप्ता महाथेरो म्हणाले की तथागत भगवान गौतम बुध्दाच्या काळात प्रसेनजित नावाचा राजा होता तोसुद्धा अशाच प्रकारे भोजनदान, धम्मदान करत होता. त्याची आज आठवण आम्हाला आली, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मुख्यमंत्र्याच्या शासकीय निवासस्थानी असा हा भोजनदानाचा कार्यक्रम झाला याची इतिहासात नोंद होईल, असे गौरवोद्गार महाथेरो यांनी काढले. वर्षावर प्रथमच अशा प्रकारचा सोहळा आयोजित केल्याबद्दल भंतेजींनी आनंद व्यक्त केला.
advertisement
वर्षावास म्हणजे नेमके काय?
बुद्धकाळापासून वर्षावास ही परंपरा चालत आलेली आहे. वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे निवास अर्थात मुक्काम... पावसाळ्याच्या तीन महिने भिख्खूंना पावसाचा त्रास होऊ नये यासाठी बुद्धविहारात जाऊन उपासक उपासिकांना धम्माचा उपदेश द्यावा, असे सांगितले गेले. आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या काळात बुद्धविहारात बुद्ध आणि त्यांचा धर्म या ग्रंथाचे वाचन करण्यात येते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 22, 2024 3:20 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मैं खुशनसीब हूँ मुझे बाबासाहब मिल गए, मैं इन्सान बन गया, मुख्यमंत्र्यांचा शायराना अंदाज