TRENDING:

Mumbai News : मुंबईकरांसाठी मोठी भेट! वाकोला ते बीकेसी प्रवास आता सुसाट; उड्डाणपुलाचा मुहूर्त ठरला

Last Updated:

BKC-Vakola Flyover : मुंबईतील सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड विस्तार प्रकल्पातील वाकोला ते बीकेसी उड्डाणपूलाचे 96 टक्के काम पूर्ण झाले आहे. पण आता हा पूल वाहतुकीसाठी खुला कधी होणार ते समोर आलेले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबईकरांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता शहरातील वाहतूकोंडी कमी होण्यासाठी आणखी एक उड्डाणपूल खुला होणार आहे.
News18
News18
advertisement

तासनतास होणारा खोळंबा संपणार

एमएमआरडीएकडून सुरू असलेल्या सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड विस्तार प्रकल्पातील वाकोला ते बीकेसी उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या उड्डाणपुलाचे सुमारे 96 टक्के काम पूर्ण झाले असून एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नव्या उड्डाणपुलामुळे 'या' मार्गातील अंतर कमी होणार

advertisement

हा उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर बांद्रा-कुर्ला संकुल ते पश्चिम द्रुतगती महामार्ग दरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे. सध्या या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकांना मोठा वेळ खर्च करावा लागतो. मात्र हा उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर या समस्येत मोठ्या प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

वाकोला जंक्शन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मुंबई विद्यापीठ जंक्शन आणि बीकेसी जंक्शन येथे पोहोचणे सोपे व्हावे, यासाठी हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा पूल दोन मार्गिकांचा असून या प्रकल्पासाठी सुमारे 645 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
AI चा खास कोर्स मोफत शिका! पिंपरी चिंचवडमध्ये कुठे करायची नावनोंदणी?
सर्व पहा

प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बीकेसीमधून पश्चिम द्रुतगती महामार्गावर जाणे अधिक सोपे होईल. त्यामुळे कार्यालयीन वेळेत होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल तसेच पूर्व-पश्चिम मुंबईला जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गांपैकी हा एक मार्ग ठरणार आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : मुंबईकरांसाठी मोठी भेट! वाकोला ते बीकेसी प्रवास आता सुसाट; उड्डाणपुलाचा मुहूर्त ठरला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल