सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ब्लिंकिट डिलिव्हरी बॉय एका महिलेला अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न करत आहे. पीडित महिलेने स्वतः हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
ही घटना 3 ऑक्टोबरला मुंबईमध्ये संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली. महिलेने ब्लिंकिट वरून काही वस्तू मागवल्या होत्या. जेव्हा डिलिव्हरी बॉय सामान घेऊन आला, तेव्हा महिला त्याला पैसे देत होती. महिलेकडून पैसे घेताना डिलिव्हरी बॉयने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला.
advertisement
महिलेने शेअर केला व्हिडिओ
या महिलेने सोशल मीडियावर याचा व्हिडिओ शेअर केला आणि ब्लिंकिटच्या अधिकृत अकाउंटला टॅग केलं. महिलेने तिच्या पोस्टमध्ये डिलिव्हरी बॉयने आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचंही सांगितलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर डिलिव्हरी बॉयने हे जाणूनबुजून केलं की चुकून त्याचा स्पर्श झाला? यावरून वाद सुरू झाला आहे.
महिलेने लिहिले की, 'ब्लिंकिटवरून ऑर्डर करताना आज माझ्यासोबत असे घडले. डिलिव्हरी बॉयने पुन्हा माझा पत्ता विचारला आणि नंतर मला अयोग्यरित्या स्पर्श केला. हे सहन करता येणार नाही. कृपया कठोर कारवाई करा'. शिवाय, महिलेने तिच्या पोस्टमध्ये ब्लिंकिट आणि मुंबई पोलिसांना टॅग केले आहे, भारतातील महिलांची सुरक्षा हा विनोद आहे का? असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे. तिने पुढे असा दावा केला आहे की ब्लिंकिटने घटनेचे पुरावे दिल्यानंतरच डिलिव्हरी बॉयवर कारवाई केली.
मुंबई पोलीस ऍक्शनमध्ये
मुंबई पोलिसांनीही तिच्या ट्विटला उत्तर देत लिहिले आहे की, 'आम्ही तुम्हाला फॉलो केले आहे. कृपया तुमची संपर्क माहिती डीएममध्ये शेअर करा.' दरम्यान ब्लिंकिटने या डिलिव्हरी बॉयवर कारवाई केली आहे, तसंच त्याच्यासोबतचा करारही रद्द केला आहे.