प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आदित्य ठाकरे शिवतीर्थावर दाखल झाले होते. यावेळी राज ठाकरे, अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यात चर्चा झाली. जवळपास 25 मिनिटे चर्चा पार पडली. या बैठकीत छुप्या प्रचारावर चर्चा करण्यात आली.जसे आज निवडणूक आयोगाने घरोघरी जाऊन प्रचार करू शकता अशी परवानगी दिल्यामुळे या उरलेल्या काही तासात कशा प्रकारे लोकांपर्यंत पोहचायचे आहे,यावर चर्चा झाल्याची सुत्रांकडून माहिती मिळते आहे. विशेष म्हणजे मतदारांना विकत घेण्यासाठी आर्थिक हालचालींवरती करडी नजर ठेवावी लागणार आहे,या मुद्यावर देखील चर्चा झाली आहे.
advertisement
निवडणुकीच्या दिवशी दुबार मतदारांवर नजर ठेवावी लागणार आहे. त्यामुळे मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून प्रत्येक बुथवर तशाप्रकारची फिल्डींग लावण्यात येणार असल्याची माहिती आहे. दुबार मतदारांसाठी स्पेशल टीम बनवण्यात येणार असल्याचे कळते. त्यामुळे अशाप्रकारची रणनिती ठाकरे बंधु आखत असल्याची चर्चा आहे.
