TRENDING:

BMC Election Results: ठाकरे शिंदेंच्या पुढे निघाले, मनसेचीही टफ फाईट, मुंबईत वातावरण टाईट!

Last Updated:

BMC Election Results: मतदानोत्तर चाचण्यांनी भाजप-शिंदेसेनेला स्पष्ट बहुमत मिळेल, महायुती अगदी १५० जागा पार करेल, असे सांगितले होते. मात्र जवळपास १०० जागांची मतमोजणी सुरू असताना ठाकरे बंधू भाजप शिंदेसेनेला तगडी टक्कर देत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५– २६ अंतर्गत १५ जानेवारी २०२६ ला झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया आज शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून विविध ठिकाणच्‍या २३ मतमोजणी कक्षात सुरू आहे. सुरुवातीच्या कलात भाजप-शिंदेसेनेला ठाकरे बंधूंनी तगडी टक्कर दिल्याचे दिसून येत आहे. मतदानोत्तर चाचण्यांनी भाजप-शिंदेसेनेला स्पष्ट बहुमत मिळेल, महायुती अगदी १५० जागा पार करेल, असे सांगितले होते. मात्र जवळपास १०० जागांची मतमोजणी सुरू असताना ठाकरे बंधू भाजप शिंदेसेनेला तगडी टक्कर देत आहेत.
मुंबई महापालिका निवडणूक
मुंबई महापालिका निवडणूक
advertisement

मुंबईत सध्या ८५ जागांवर मतमोजणी सुरू आहे. त्यापैकी ३४ जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर शिंदेसेना ११ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे ठाकरे सेना शिंदेसेनेच्या पुढे निघाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार २२ ठिकाणी आघाडीवर आहेत. मनसेचे ८ उमेदवारही आघाडीवर आहेत.

काँग्रेसनेही विजयाचे खाते उघडले आहे. काँग्रेसची ५ जागांवर आघाडी असून धारावीमधून काँग्रेसच्या आशा काळे विजयी झाल्या आहेत. त्यांनी सेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या वैशाली शेवाळे यांना पराभवाचा धक्का दिला.

advertisement

मुंबईत कोण कोण विजयी झाले?

आशा काळे- काँग्रेस

तेजस्वी घोसाळकर-भाजप

नवनाथ बन- भाजप

मिलिंद वैद्य- शिवसेना ठाकरे गट

अश्रफ आजमी-काँग्रेस

शैला दिलीप लांडे- शिंदेसेना

कुठे कुठे मतमोजणी केंद्र?

-धारावी : भारतरत्न राजीव गांधी जिल्हा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, धारावी बस डेपो रोड, धारावी

-सायन कोळीवाडा : न्यू सायन म्युनिसिपल स्कूल, सायन (पूर्व) लायन्स तारा चंदबाप्पा हॉस्पिटलजवळ

advertisement

-वडाळा : महानगरपालिका न्यू बिल्डिंग, भगवान वाल्मीकी चौक, हनुमान मंदिराजवळ, विद्यालंकार मार्ग, अँटॉप हिल

-माहीम : इमराल्ड हॉल, डॉ. अँथोनिया डी. सिल्वा माध्यमिक शाळा, राव बहादूर एस. के. बोले रोड, दादर

-वरळी : महालक्ष्मी स्पोर्ट्स ग्राउंड हॉल, वेस्टर्न रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशन, फिनिक्स मॉलसमोर, सेनापती बापट मार्ग, महालक्ष्मी

-शिवडी : एन. एम. जोशी रोड म्युनिसिपल प्रायमरी मराठी शाळा, एन. एम. जोशी मार्ग, करीरोड

advertisement

-भायखळा : रिचर्डसन क्रुडास कंपनी लिमिटेड, सर जे. जे. रोडजवळ, भायखळा

-मलबार हिल : विल्सन कॉलेज हॉल, नेताजी सुभाषचंद्र मार्ग, चर्नीरोड

-मुंबादेवी : गिल्डरलेन महानगरपालिका शाळा, गिल्डर लेन, मुंबई सेंट्रल स्टेशन

-कुलाबा : सर जे. जे. आर्ट स्कूल कॅम्पस, सीएसएमटी स्टेशन, फोर्ट

-बोरीवली : १३/सी एफसीआय गोडाऊन, बोरिवली

-दहिसर : रुस्तुमजी बिझनेस कॉम्पलेक्स महानगरपालिका मंडई. बिल्डिंग, दहिसर

advertisement

-मागाठाणे : कँटिन हॉल, सीटीआयआरसी अभिनवनगर, राष्ट्रीय उद्यानाजवळ, बोरीवली

-कांदिवली पूर्व : पालिका सोशल वेल्फेअर सेंटर, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली

-चारकोप : बजाज म्युनिसिपल स्कूल, बजाज रोड, कांदिवली

-मालाड पश्चिम : टाऊनशिप म्युनिसिपल हिंदी सीबीएससी इंग्लिश मालवणी मार्वे रोड

-जोगेश्वरी पूर्व : बॅटमिंटन हॉल, न्यू जिमखाना बिल्डिंग, इस्माईल युसुफ कॉलेज कम्पाउंड, जोगेश्वरी

-दिंडोशी : मुंबई पब्लिक स्कूल, कुरार व्हिलेज, मालाड

-गोरेगाव : उन्नतनगर मुंबई पब्लिक स्कूल उन्नतनगर २, गोरेगाव

-वर्सोवा : शहाजीराजे भोसले स्पोर्टस कॉम्पलेक्स, आझादनगर, अंधेरी पश्चिम

-अंधेरी पश्चिम : एसएनडीटी महिला विद्यापीठ जुहू रोड, सांताक्रूझ पश्चिम

-अंधेरी पूर्व : गावदेवी महापालिका शाळा, मथुरादास रोड, अंधेरी पूर्व

-मुलुंड : मुंबई पब्लिक स्कूल, मिठागररोड, मुलुंड पूर्व

-विक्रोळी : एम. के. ट्रस्ट सेकंडरी स्कूल मुख्य इमारत, कन्नमवारनगर, विक्रोळी (पूर्व

-भांडूप : सेंट झेवियर्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, एल.बी.एस.रोड, कांजूरमार्ग पश्चिम

-घाटकोपर पश्चिम : मुंबई पब्लिक स्कूल, वर्षानगर, वीर सावरकर मार्ग, कैलाश कॉम्प्लेक्स पार्क साईट, विक्रोळी पश्चिम

-घाटकोपर पूर्व : मुंबई पब्लिक स्कूल, पंतनगर नं. ३ कॉम्प्लेक्स, घाटकोपर पूर्व

-मानखुर्द : शिवाजीनगर - म्युनिसिपल मॅटर्निटी हॉस्पिटल, लल्लुभाई कम्पाउंड, मानखुर्द.

-विलेपार्ले : मुंबई पब्लिक स्कूल, विलेपार्ले पूर्व, म्युनिसिपल मराठी प्राथमिक शाळा, कमलानगर, विलेपार्ले पश्चिम

-चांदिवली : आयटीआय, किरोळरोड, विद्याविहार पश्चिम

-कुर्ला : शिवसृष्टी कामराजनगर महापालिका शाळा, कुर्ला पूर्व

-कलिना : मल्टी पर्पज हॉल, मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस, सांताक्रूझ पूर्व

-वांद्रे पूर्व : ग्रीन टेक्नॉलॉजी बिल्डींग, मुंबई विद्यापीठ, कलिना

-वांद्रे पश्चिम : आर. व्ही. टेक्निकल हायस्कूल, खार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दर तेजीत, गुळ आणि शेवग्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

-अणुशक्तीनगर : लोरेटो कॉव्हेंट स्कूल, आरसीएफ कॅम्पस, चेंबूर

Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
मराठी बातम्या/मुंबई/
BMC Election Results: ठाकरे शिंदेंच्या पुढे निघाले, मनसेचीही टफ फाईट, मुंबईत वातावरण टाईट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल