TRENDING:

Mumbai : मुंबई होणार फेरीवालामुक्त! पालिकेचा मास्टर प्लॅन; फुटपाथ आता चालण्यासाठी मोकळे

Last Updated:

Mumbai News : मुंबईतील नागरिकांसाठी एक आंदाची बातमी समोर येत आहे. आता रस्त्यावरुन जाताना प्रत्येक नागरिकाला वाट मोकळी मिळणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबईत वाढत्या अतिक्रमणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने आता अधिक कडक भूमिका घेतली आहे. नेमका महापालिकेचा प्लॅन काय आहे आणि कशा पद्धतीने शहरातील नागरिकांना यावर समाधान मिळेल ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
News18
News18
advertisement

महापालिकेचा 'अ‍ॅक्शन प्लॅन' तयार

पश्चिम उपनगरातील अंधेरी परिसरातील 'के-पश्चिम' विभागात अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कारवाईसाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका कंत्राटी कामगारांची मदत घेणार आहे.

या मोहिमेसाठी कंत्राटी कामगार पुरवण्यासाठी नोंदणीकृत संस्थांना बंद पाकिटात अर्ज पाठवण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. अंधेरी पश्चिममधील रेल्वे स्थानक परिसर, एस. व्ही. रोड तसेच इतर महत्त्वाच्या मार्गावर अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत असून पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे.

advertisement

नेमकी कोणाची घेणार मदत?

ही समस्या सोडवण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकासोबत अतिरिक्त कामगार तैनात करण्यात येणार आहेत. मार्च ते जुलै 2026 या पाच महिन्यांच्या कालावधीसाठी हे कामगार कंत्राटी तत्त्वावर नियुक्त केले जाणार आहेत. या दिवसांत अतिक्रमण हटवण्याची मोहीम अधिक प्रभावीपणे राबवली जाणार आहे.

या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आयुक्त आणि महापालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या स्थानिक अशासकीय संस्था, मजूर सहकारी संस्था, सेवा सहकारी संस्था, बेरोजगार सेवा सहकारी संस्था तसेच औद्योगिक सेवा सहकारी संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शिक्षण फक्त दहावी, गावात राहून इंजिनिअरपेक्षा जास्त कमाई, शेतकऱ्यानं काय केलं? V
सर्व पहा

महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार ठरलेल्या मुदतीनंतर मिळणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे इच्छुक संस्थांनी वेळेत अर्ज सादर करावेत असेही आवाहन करण्यात आले आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : मुंबई होणार फेरीवालामुक्त! पालिकेचा मास्टर प्लॅन; फुटपाथ आता चालण्यासाठी मोकळे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल