TRENDING:

आताची सर्वात मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी, तातडीनं रिकामा केला परिसर

Last Updated:

मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने कोर्ट परिसर रिकामा करण्यात आला. पोलिस तपास सुरू असून अटक केलेल्या दहशतवाद्यांशी संबंध तपासला जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दिल्लीनंतर आता मुंबईतही बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबईतील उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर तात्काळ खबरदारी म्हणून कोर्ट परिसर रिकामा करण्यात आलं. सध्या सुरक्षा यंत्रणांकडून संपूर्ण परिसरात कसून तपास सुरू आहे.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, हा धमकीचा ई-मेल शुक्रवारी सकाळी आला. या मेलमध्ये कोर्ट बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ पावले उचलली. कोर्ट परिसरातील सर्व कामकाज थांबवून कर्मचाऱ्यांसह लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. बॉम्बशोधक आणि नाशक पथक आणि स्थानिक पोलीस पथके घटनास्थळी पोहोचली असून, प्रत्येक कोपऱ्याचा तपास करत आहेत.

advertisement

स्पेशल सेलने देशभरातून पाच संशयित दहशतवाद्यांना बुधवारी आणि गुरुवारी कारवाई करुन अटक केली होती. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटकेही जप्त करण्यात आली होती. त्यामुळे, या घटनेचा आणि अटक केलेल्या दहशतवाद्यांचा काही संबंध आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. या गंभीर घटनेमुळे मुंबई शहराच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

advertisement

मुंबई पाठोपाठ दिल्ली हायकोर्टालाही उडवून देऊ असा ईमेल आल्याने खळबळ उडाली आहे. दिल्ली हायकोर्टात देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोर्टाचा परिसर तातडीनं रिकामा करण्यात आला असून तपास सुरू आहे. मुंबईत गुरुवारी शाळेत बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई मेल आला होता. त्यानंतर आता हायकोर्टला टार्गेट केलं जात असल्याचं समोर आलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
आताची सर्वात मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी, तातडीनं रिकामा केला परिसर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल