पात्रतेचे निकष काय?
सेंट्रल बँक ऑफ इंडियातील भरतीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी घेतलेली असावी. याशिवाय मेडिकल, चार्टर्ड अकाऊंटन्सी (CA) आणि इंजिनीअरिंग सारखी विशेष पात्रता असलेले उमेदवार देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात. भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय 21 वर्षापेक्षा कमी आणि 32 वर्षापेक्षा जास्त नसावे. त्यासाठी वयाची गणना 30 नोव्हेंबर 2024 च्या आधारे करण्यात येणार आहे.
advertisement
शेतकरी आत्महत्या पाहिली अन् IT तली नोकरी सोडली, आता काम असं की, तुम्हीही कराल कौतुक!
कसा करायचा ऑनलाईन अर्ज?
सर्वप्रथम सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अधिकृत संकेतस्थळ ‘centralbankofindia.co.in’ या वर जायचं. त्यानंतर होमपेजवरील भरतीसंबंधित लिंकवर क्लिक करावी. पुढे ‘Apply Online’ या बटणावर क्लिक करा आणि संपूर्ण अर्ज भरा. आता आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज शुल्क भरा. त्यानंतर तुमच्या अर्जाची प्रिंट घ्या.
अर्जसाठी शुल्क किती?
सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील भरतीसाठी आरक्षणानुसार अर्जाचे शुल्क आकारण्यात येत आहे. जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 850 रुपये असणार आहे. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांसाठी 175 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
निवड प्रक्रिया कशी?
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळवण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा द्यावी लागेल. यामध्ये बँकिंगसोबतच इंग्रजी, संगणक, जनरल अवेअरनेस आणि इकॉनॉमिक्सचे प्रश्न विचारले जातील. त्यानंतर ऑनलाईन परीक्षेच्या निकालाच्या आधारे यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. शेवटी परीक्षा आणि मुलाखत यांच्या एकत्रित गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. अधिक माहितीसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अधिकृत संकेतस्थळ centralbankofindia.co.in. यावर भेट देऊ शकता.