TRENDING:

Bank Recruitment : भरघोस पगार आणि सरकारी नोकरी! सेंट्रल बँकेत 350 जागांसाठी भरती; पात्रता आणि अटी जाणून घ्या

Last Updated:

Officer Recruitment 2026 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मार्केटिंग ऑफिसर आणि फॉरेन एक्सचेंज ऑफिसर पदांसाठी 350 जागांची भरती जाहीर झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सरकारी बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न करु इच्छितणाऱ्यां तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मार्केटिंग ऑफिसर आणि फॉरेन एक्सचेंज ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.
News18
News18
advertisement

अर्जासाठी उरलेत काहीच दिवस

या भरती प्रक्रियेची नोंदणी 20 जानेवारी 2026 पासून सुरू झाली आहे. सेंट्रल बँकेत एकूण 350 पदांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये मार्केटिंग ऑफिसर पदासाठी 300 जागा तर फॉरेन एक्सचेंज ऑफिसर पदासाठी 50 जागा उपलब्ध आहेत. चांगल्या बँकेत नोकरी करण्याची ही मोठी संधी मानली जात आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 फेब्रुवारी 2026 आहे. त्यामुळे उमेदवारांकडे सुमारे 10 दिवसांचा कालावधी आहे. उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाणार असून ही परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. लेखी परीक्षेनंतर मार्च किंवा एप्रिलमध्ये मुलाखत घेतली जाईल.

advertisement

मिळणार भरघोस पगार

या भरतीसाठी 22 ते 35 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी असणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 48,480 रुपये ते 1,05,380 रुपये इतका आकर्षक पगार मिळणार आहे.

फॉरेन एक्सचेंज ऑफिसर पदासाठी AICTE किंवा UGC मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी आवश्यक आहे. तसेच CFA, CA, MBA पदवीधारक उमेदवार अर्ज करू शकतात. मार्केटिंग ऑफिसर पदासाठी MBA, बिझनेस अ‍ॅनालिटिक्समध्ये पदव्युत्तर शिक्षण किंवा डिप्लोमा आवश्यक आहे.

advertisement

जाणून घ्या संपूर्ण अर्ज प्रक्रिया

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पावभाजी ते अंडा राईस, फक्त 30 रुपयांपासून,पुण्यात इथं असते खाण्यासाठी मोठी गर्दी
सर्व पहा

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी centralbank.bank.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन Recruitment विभागात Apply Online वर क्लिक करावे. त्यानंतर IBPS वेबसाइटवर लॉग इन करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

मराठी बातम्या/मुंबई/
Bank Recruitment : भरघोस पगार आणि सरकारी नोकरी! सेंट्रल बँकेत 350 जागांसाठी भरती; पात्रता आणि अटी जाणून घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल