गाड्यांचे वेळापत्रक
1) ट्रेन क्रमांक 07604: ही विशेष गाडी 23 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत दर मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून दुपारी 4.35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वाजता नांदेड येथे पोहोचेल.
2) ट्रेन क्रमांक 07603: ही गाडी 22 ते 29 सप्टेंबर 2025 पर्यंत दर सोमवारी रात्री 11.45 वाजता नांदेडहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 1.40 वाजता मुंबईत पोहोचेल.
advertisement
गाड्यांची रचना
1 वातानुकूलित प्रथम, 2 वातानुकूलित द्वितीय, 6 वातानुकूलित तृतीय, 6 शयनयान, 4 सामान्य डबे, 2 जनरेटर कार आणि 1 पॅन्ट्री कार अशी सोय करण्यात आली आहे.
थांबे कुठे?
ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नागरसोल, औरंगाबाद, जालना, परतूर, परभणी यांसह एकूण 15
ठिकाणी गाड्या थांबतील.
आरक्षण कधी सुरू होणार?
या गाड्यांचे आरक्षण 20 सप्टेंबर 2025 पासून सुरू होईल. प्रवासी सर्व आरक्षण केंद्रांवर तसेच www.irctc.co.in या संकेतस्थळावर तिकीट बुक करू शकतील. तसेच आरक्षित नसलेल्या डब्यांची तिकिटे UTS अॅपद्वारे घेता येतील.