पनवेल-चिपळूण स्पेशल ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक
गाडी क्रमांक 01159 अनारक्षित पनवेल-चिपळूण विशेष रेल्वेगाडी 3 ऑक्टोबरपासून 26 ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावणार आहे. ही गाडी पनवेलहून दुपारी 4.40 वाजता सुटेल आणि चिपळूण येथे रात्री 9.55 वाजता पोहोचेल.
परतीची गाडी क्रमांक 01160 अनारक्षित चिपळूण-पनवेल विशेष रेल्वेगाडी त्याच तारखांना म्हणजे 3 ते 26 ऑक्टोबरदरम्यान प्रत्येक शुक्रवार, शनिवार आणि रविवार धावणार आहे. ही गाडी चिपळूणहून सकाळी 11.05 वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुपारी 4.10 वाजता पोहोचेल.
advertisement
जाणून घ्या गाडीचे थांबे
पनवेल ते चिपळूणदरम्यान या विशेष रेल्वेगाडीला सोमाटणे, आपटा, जिते, पेण, कासू, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी या स्थानकांवर थांबा असेल.
गाडीमध्ये एकूण किती डबे?
या विशेष गाडीत एकूण 8 मेमू डबे असतील. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने ही विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या मते या अतिरिक्त गाड्यांमुळे कोकणमार्गावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते. त्यामुळे या अतिरिक्त गाड्यांमुळे गर्दीचे नियोजन सुलभ होईल आणि प्रवाशांना वेळेवर प्रवास करता येईल.
रेल्वे प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की या विशेष गाड्यांची माहिती आणि वेळापत्रक IRCTC च्या वेबसाईटवर तपासावे. प्रवास करताना नियम पाळावे आणि शक्य असल्यास आधीच तिकीट बुक करावे असे सांगितले आहे. मध्य रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे दिवाळी सणाच्या काळात प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी अधिक सुविधा आणि सोय उपलब्ध होणार आहे.