TRENDING:

Mumbai Local: मुंबईकर रविवारी खोळंबा होणार, मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, कसं असेल वेळापत्रक?

Last Updated:

Mumbai Local: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रविवारी मध्य रेल्वे मार्गावर खोळंबा होणार असून वेळापत्रक पाहूनच प्रवासाचं नियोजन करावं लागेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुंबईकर लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रविवारी मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून लोकल सेवांवर परिणाम होणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामे करण्यात येणार असल्याने प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी वेळापत्रक पाहूनच नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Mumbai Local: मुंबईकर रविवारी खोळंबा होणार, मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, कसं असेल वेळापत्रक?
Mumbai Local: मुंबईकर रविवारी खोळंबा होणार, मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, कसं असेल वेळापत्रक?
advertisement

मध्य रेल्वे मार्गावर ब्लॉक

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 या वेळेत असेल. या कालावधीत सीएसएमटी येथून सकाळी 10.36 ते दुपारी 3.10 दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकात डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल माटुंगा ते मुलुंडदरम्यान त्यांच्या नेहमीच्या थांब्यांवर थांबतील. तसेच ठाणे येथून सकाळी 11.03 ते दुपारी 3.38 दरम्यान सुटणाऱ्या अप जलद लोकल मुलुंड स्थानकात अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्या लोकल मुलुंड ते माटुंगा दरम्यान सर्व निर्धारित स्थानकांवर थांबून नंतर पुन्हा अप जलद मार्गावर जातील.

advertisement

Western Railway: प्रवाशांसाठी मोठी बातमी! वर्षाच्या शेवटी पश्चिम रेल्वे रडवणार, एकाच दिवशी तब्बल 277 लोकल रद्द

हार्बर मार्गावर खोळंबा

हार्बर रेल्वे मार्गावरही रविवारी मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे डाऊन मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 दरम्यान ब्लॉक असेल. याच काळात अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 दरम्यान वाहतूक बंद राहणार आहे. या ब्लॉकमुळे सीएसएमटी येथून सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 दरम्यान वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन लोकल तसेच सकाळी 10.48 ते संध्याकाळी 4.43 दरम्यान वांद्रे आणि गोरेगावकडे जाणाऱ्या डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कन्यादानाला तयार, पण अन्नदानाचं काय? इराण युद्धामुळं पुण्यातली लग्नं रद्द होण्याची वेळ, काय घडतंय? Video
सर्व पहा

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिकृत वेळापत्रक तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: मुंबईकर रविवारी खोळंबा होणार, मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, कसं असेल वेळापत्रक?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल