आजही सीएनजीची किंमत पेट्रोलच्या तुलनेत कमी आहे हे अगदी खरं आहे. पेट्रोलच्या तुलनेत CNG गाड्या जास्त मायलेजही देतात. त्यामुळे सहाजिकच लोक CNG कडे वळत आहेत. मात्र तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एकूणच किंमत आणि प्रवास किंवा मायलेजचा विचार न करता सारासार विचार करण्याची गरज आहे.
जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल आणि CNG कार घ्यायची की पेट्रोल कार घ्यायची या भ्रमात असाल तर आधी दोन्ही कारचे फायदे आणि तोटे जाणून घ्या. आता सीएनजीची किंमत पेट्रोलपेक्षा कमी नाही आणि सीएनजी कारची किंमत पेट्रोल कारपेक्षा 1 ते 1.30 लाख रुपये जास्त आहे. पेट्रोल कार चांगली की सीएनजी कार? या प्रश्नाचे उत्तर येथे उदाहरणाद्वारे समजून घेऊ.
advertisement
मुंबईत ते गोवा अंतर 598 किलोमीटर अंतर आहे. साधारण ही गाडी एक लिटर पेट्रोलमध्ये 20 किलोमीटर जाते असा अंदाज धरू. 20 किमी मायलेजला जर 1 लिटर पेट्रोल लागत असेल तर एकूण 598 किलोमीटरसाठी २९.९ लिटर पेट्रोल लागेल. 106 रुपये आजच्या हिशोबाने विचार केला तर 29.9 * 106 म्हणजे तुम्हाला एकूण 3169.4 लीटर पेट्रोल लागेल.
तेच तुम्ही CNG कार घेण्याचा विचार करत आहात, तर मुंबई ते गोवा अंतर 598 किलोमीटर अंतर आहे. साधारण ही गाडी एक किलो CNG मध्ये 30 किलोमीटर जाते असा अंदाज धरू. 20 किमी मायलेजसाठी जर 1 किलो CNG लागत असेल तर एकूण 598 किलोमीटरसाठी २९.९ किलो CNG लागेल. 87 रुपये आजच्या हिशोबाने विचार केला तर 29.9 * 87 म्हणजे तुम्हाला एकूण 1734 रुपयांचा CNG लागले.
विचार केला तर तुम्हाला जवळपास 1400 रुपयांचा पेट्रोल आणि CNG मध्ये फरक पडतो. आता एकूण टक्केवारीचा विचार करायचा तर 44 टक्क्यांचा फरक या दोघांमध्ये पडतो. आता तुम्ही गणपतीला जर गावी जायचा विचार करत असाल तर आयत्यावेळी तुम्ही तिकीट काढलं किंवा बसने जरी जायचं म्हटलं तरी तिकीट साधारण 1000 रुपये लागणारच आहे. मग तुम्ही ह्या पर्यायाचा देखील विचार करु शकता.