मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी पावणे बाराच्या सुमारास अर्जुन आणि सानियाचा विवाह सोहळा पारंपारिक पद्धतीने पार पडला. गेल्या काही दिवसांपासून या लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. हळदी आणि मेहंदी समारंभाचे फोटो आधीच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामध्ये तेंडुलकर कुटुंब आनंदाने नाचताना दिसले होते. आता अर्जुन तेंडूलकर आणि सानिया चंडोक यांच्या लग्नाचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत.
advertisement
अर्जुन तेंडुलकर-सानिया चंडोकच्या लग्नाचे व्हिडीओज
यातील एका व्हिडीओत अर्जुन सानियाला वरमाला घालताना दिसत आहे. वरमाला घालताच त्याने आपल्या पत्नीला मिठी मारली आहे. या क्षणाचा व्हिडीओ आता समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत मुलगा अर्जुन आणि सून सानियाचं बाँडींग पाहून सचिनही भावूक झाल्याचं दिसत आहे.
आता अर्जुन आणि सानियाच्या लग्नाचे इनसाईड व्हिडिओ आणि फोटो इन्स्टाग्रामवर ट्रेंड होत आहेत. अर्जुन तेंडुलकर सध्या क्रिकेटमध्ये आपले नशीब आजमावत असून, आता आयुष्याच्या नवीन इनिंगला त्याने सुरुवात केली आहे.
या लग्नात श्रेयस अय्यरही पोज देताना दिसून आला.
अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाला कुणाची उपस्थिती
या लग्न सोहळ्याला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळांडूसह, राजकीय नेते, आणि बॉलीवूड सेलिब्रीटी देखील हजर होते. यात अजिंक्य रहाणे, अनिल कुंबळे, अजित आगरकर, सुप्रिया सुळे, राज ठाकरे, सुनील गावस्कर, शंकर महादेवन, फरहान अख्तर, युवराज सिंह, शायना एनसी, झहीर खान, महेंद्रसिंह धोनी, आशिष नेहरा, श्रेयस अय्यर, इरफान पठाण असे अनेक दिग्गज मंडळी आपल्या कुटुंबासह या सोहळ्याला हजर होते.
सानियाचा लाल लेहेंगा आणि अर्जुनचा राजेशाही थाट
या खास दिनी नववधू सानिया चंडोकने गडद लाल रंगाचा भरजरी लेहेंगा परिधान केला होता, ज्यामध्ये तिचे सौंदर्य खुलून दिसत होते. तर अर्जुन तेंडुलकरनेही त्याला साजेसा पारंपारिक पांढऱ्या आणि क्रीम रंगाचा नक्षीदार पोशाख परिधान केला होता. या दोघांच्या जोडीचे फोटो सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
