लहान भावाला कायम टोमणे मारले : शर्मिला ठाकरे
शर्मिला ठाकरे म्हणाल्या, त्यांनी आभार मानायची संधी आम्हाला केव्हाच दिली नाही. एणकेण प्रकरणावरून त्यांनी आम्हाला चिमटे काढले. त्यावरून पण बोलायची संधी सोडली नाही, मी माझ्या पुतण्यावर विश्वास दाखवला. आम्हाला अजून आभार मानायची वेळ आली नाही असा टोला लगावत लहान भावाला कायम बोलतात, टोमणे मारायची संधी सोडत नाहीत, अशी खंतही शर्मिला ठाकरेंनी व्यक्त केली.
advertisement
चांगले निर्णय घ्यायला त्यांना कुणी थांबवलं होतं? : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते, त्यांचे हात धरले होते का? चांगले निर्णय घ्यायला त्यांना कोणी थांबवलं होतं. सर्व विरोधी पक्ष नेते म्हणतायत की आरक्षण द्या पण मराठा आरक्षण त्यांनी का दिल नाही? तुम्हाला कोणी थांबवलं होतं? शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत बसले होते ना? धारावीचा पुनर्वीकास करायचा होता, मग तुम्ही का केला नाही? असा सवाल करत साहेबांनी याबद्दल भूमिका स्पष्ट केली असल्याचे त्यांनी सांगितले.
शर्मिला ठाकरेंची भूमिका तीच पक्षाची भूमिका
शर्मिला ठाकरे यांची जी भूमिका आहे, तीच भूमिका आमची आहे आणि तीच भूमिका पक्षाची सुद्धा आहे. ठाकरे परिवारातील कोणताही व्यक्ती असं कृत्य करणार नाही, असाच आमचा विश्वास आहे. सूडभावना आहे की नाही यावर मी बोलणार नाही. पण ठाकरे कुटुंबातील कोणीही असं कृत्य करणार नाही. शेवटी ते ठाकरे कुटुंब आहे, अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
वाचा - 'धारावीत मोर्चा काढल्यानंतर समजलं चमचे कोण..' उद्धव ठाकरेंचा राज यांना टोला
काय आहे दिशा सालियन प्रकरण?
मुंबईतील टॅलेंट मॅनेजर दिशा सालियन हिचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला. 8 जूनच्या मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरून 28 वर्षीय दिशा पडली होती. या घटनेच्या दोन दिवसांनी म्हणजेच 11 जून रोजी दिशाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. शवविच्छेदन करण्यास दोन दिवसांचा विलंब का झाला? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. दिशाच्या आत्महत्येनंतर काही दिवसंनी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागलं.