TRENDING:

Mumbai: संतापजनक! कुलाबा आर्ट गॅलरीमध्ये हिंदू देवतांच्या आक्षेपार्ह चित्रांचं प्रदर्शन, 2 जणांवर गुन्हे दाखल

Last Updated:

मांडवी कोळीवाडा मस्जिद भागातील रहिवासी वकील विशाल लालचंद नाखवा यांनी ही तक्रार दाखल केली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुंबईतील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कुलाबा परिसरातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. कुलाब  आर्ट गॅलरीमध्ये हिंदू देवतांच्या आक्षेपार्ह नग्न चित्रांचे प्रदर्शन भरवल्याचा प्रकार समोर आला आहे.  कला दालनातील चित्रप्रदर्शनीत हिंदू देवता भगवान शिव आणि देवी महाकाली यांच्या अश्लील चित्रांचं प्रदर्शन केल्याचा तक्रारीत आरोप केला आहे. या प्रकरणी  कुलाबा पोलिसांनी अभय मस्कारा आणि टी वैकन्ना आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार,  मांडवी कोळीवाडा मस्जिद भागातील रहिवासी वकील विशाल लालचंद नाखवा यांनी ही तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत 26 सप्टेंबर रोजी त्यांना व्हॉट्सअपवर एक संदेश मिळाला होता.  कुलाबा येथील तिसऱ्या पास्ता लेन येथील गॅलरी मस्कारा इथं आक्षेपार्ह कलाकृती प्रदर्शित केल्या जात आहेत. त्यानंतर त्यांनी  गॅलरीला भेट दिली.  तेव्हा त्यांना "युनियन फॉर पीस" या शीर्षकाखाली देवी महाकाली आणि भगवान शिव यांच्या फ्रेम केलेले, नग्न आणि अश्लील चित्रांची फ्रेम दिसली. हे अश्लील केलेले चित्र पाहून, नाखवा यांनी धक्का बसला.  या प्रदर्शनात,लैंगिक स्थितीत असलेल्या नग्न पुरुष आणि महिलांची इतर अनेक चित्रे उघडपणे प्रदर्शित होते.

advertisement

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार,18 वर्षांखालील अल्पवयीन मुलांना प्रवेश देण्यास मनाई करणारा कोणताही बोर्ड याठिकाणी नव्हता.  ज्यामुळे प्रदर्शन आणखी आक्षेपार्ह बनले.  हे दृश्य पाहून अस्वस्थ होऊन नाखवा यांनी, उपस्थित कर्मचाऱ्यांशीही बोलले.  त्यांनी त्यांना सांगितले की, गॅलरी अभय मस्कारा यांच्या मालकीची आहे आणि वादग्रस्त चित्रे टी वैकन्ना नावाच्या कलाकाराने बनवली आहे.

गॅलरी मालक अभय मस्कारा आणि कलाकार टी वैकन्ना यांच्याविरुद्ध हिंदू देवतांचे अश्लील चित्रण दाखवून धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अखेर पोलिसांकडे  तक्रार दाखल केली आहे.  कुलाबा पोलिसांनी  दोन्ही आरोपींना समन्स बजावलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: संतापजनक! कुलाबा आर्ट गॅलरीमध्ये हिंदू देवतांच्या आक्षेपार्ह चित्रांचं प्रदर्शन, 2 जणांवर गुन्हे दाखल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल