एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी वांद्रे ते कुर्ला (व्हाया बीकेसी) अशा 8.8 किलोमीटर लांबीच्या मार्गावर पॉड टॅक्सीच्या उभारणीला मंजुरी दिली होती. आता याच धर्तीवर मुंबईत आणखी पॉड टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी पॉड टॅक्सी आणि केबल टॅक्सीचा देखील विचार सुरू आहे.
Konkan Railway: कोकण रेल्वेने प्रवास करताय? आधी बदललेलं वेळापत्रक पाहा, या गाड्या रद्द!
advertisement
सरनाईक यांची गुजरातला भेट
मुंबईतील पॉड टॅक्सीच्या प्रस्तावास गती देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुजरातमधील बडोदा शहराला भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय भूपृष्ण वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून बडोद्यामध्ये पॉड टॅक्सी वे बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सध्या 80 टक्के काम पूर्ण झाले अशून एप्रिलमध्ये ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
पॉड टॅक्सी म्हणजे काय?
युरोपमध्ये प्रवासासाठी पॉड टॅक्सी आणि केबल टॅक्सी सेवा मोठ्या प्रमाणात वापरली जाते. या दोन्ही प्रकारच्या टॅक्सी या चालकरहित असतात. पॉड टॅक्सी ही इलेक्ट्रिक कार सारखी असते. या सेवेला ‘पर्सनल रॅपिड ट्रान्झिट’ असं देखील म्हटलं जातं. या टॅक्सीत साधारण 8 प्रवासी बसून प्रवास करू शकतात आणि 13 प्रवासी उभा राहून प्रवास करू शकतात. पॉड टॅक्सी जमिनीपासून 5 ते 10 मीटर उंचीवरून धावते. पॉड टॅक्सी ही जगातील प्रगत आणि पर्यावरणपुरक वाहतूक सेवा आहे. त्यामुळे जगभरातील अनेक देश जलद व सुखकर प्रवासासाठी पॉड टॅक्सीला पसंती देत आहेत.






