TRENDING:

Shocking Incident : बापरे! सूड घेण्यासाठी इंद्रजितने गाठलं टोक, मित्राला थेट दहशतवादी ठरवलं, काय केलं?

Last Updated:

Navi Mumbai Shocking News : नवी मुंबईत राहत असलेल्या एका तरुणाने फक्त आपल्या मित्राला त्रास देण्यासाठी विचित्र आणि तितकाच संतापजनक प्रकार केलेला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी मुंबई : नवी मुंबई शहरातू एक धक्कादायक आणि तितकाच संतापजनक प्रकार समोर आला असून एका तरुणाने दारुच्या नशेत मित्राचा घात केला, मात्र हा घात त्याच्यावरच उलटला. मित्राला त्रास देण्यासाठी त्याने चक्क पोलिसांना बॉम्बस्फोटाचा आरोपी असल्याची खोटी माहिती दिली आणि शेवटी तो स्वत:च पोलिसांच्या जाळ्यात अडकला..
मित्राला त्रास देण्यासाठी मद्यधुंद अवस्थेत पोलीस कंट्रोल रूमला 'बॉम्बस्फोटातील आरोपी' असल्याची खोटी माहिती
मित्राला त्रास देण्यासाठी मद्यधुंद अवस्थेत पोलीस कंट्रोल रूमला 'बॉम्बस्फोटातील आरोपी' असल्याची खोटी माहिती
advertisement

नशेत असताना भान हरपले

नवी मुंबई इंद्रजित मिश्रा हा तरुण वास्तव्यास आहे. रविवार मध्यरात्री जेव्हा संपूर्ण शहर झोपले होते. तेव्हा याने मद्यधुंद अवस्थेत पोलिस कंट्रोल रुममध्ये फोन करुन खळबळ उडवून दिली. ज्यात त्याने पोलिसांना कॉल करुन सांगितले. त्याचा मित्र मोहम्मद इमरान हा मुंबई बॉम्बस्फोटाली मुख्य आरोपी आहे. इंद्रजितने पोलिसांना त्याचे नाव नाही तर थेट पत्ताही दिला. हाच तो आरोपी आहे, त्याता तुम्ही तातडीने अटक करा असे सांगितले.

advertisement

बॉम्बस्फोटा विषयीची गंभीर माहिती मिळताच नवी मुंबई पोलीस सतर्क झाले आणि त्यांनी तातजीने तपास सुरु केला. मात्र पोलिसांनी जेव्हा इमरानची चौकी केली शिवाय त्याची सर्व कागदपत्रे तपासली, तेव्हा त्यांना काही वेगळेच सत्य असल्याचे समोर आहेल. मोहम्मद इमरान हा कोणत्याही गुन्हेगारी किंवा बॉम्बस्फोटाच्या प्रकरणाशी संबंधित नसल्याचे स्पष्ट झाले

खोटी माहिती देणे पडले महागात

advertisement

पोलिसांनी केलेल्या अधिक तपासात धक्कादायक खुलासा झाला. इंद्रजित आणि मोहम्मद हे एकमेंकाचे मित्र आहेत. पण त्यांच्यात काही कारणावरुन वाद झाला होता. त्याच वादाचा राग मनात धरुन मोहम्मदला अडकवण्यासाठी आणि त्याला त्रास देण्यासाठी इंद्रजितने असा प्रकार केला.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Agriculture Tips: शेतीला कीड-रोगांचा धोका, उन्हाळ्यात कशी घ्यावी काळजी? पाहा कृषी तज्ज्ञांचा सल्ला, Video
सर्व पहा

दारूच्या नशेत केलेला हा खोडसाळपणा हा इंद्रजितला चांगलाच महागात पडला आहे. पोलिसांची दिशाभूल करणे आणि खोटी माहिती देऊन यंत्रणेचा वेळ वाया घालवल्याप्रकरणी आता इंद्रजित मिश्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Shocking Incident : बापरे! सूड घेण्यासाठी इंद्रजितने गाठलं टोक, मित्राला थेट दहशतवादी ठरवलं, काय केलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल