TRENDING:

Mumbai Best Bus : 83 वर्षांची साथ सुटणार... मुंबईकरांची लाडकी बेस्टची एक बस होणार इतिहास जमा

Last Updated:

Mumbai News : मुंबईकरांच्या आवडती बेस्ट बस आता इतिहासातच थांबली आहे. बेस्टच्या ताफ्यातून ही बस आता बाजूला केली गेली आहे. अनेक वर्षांपासून प्रवाशांच्या सोयीसाठी सेवा दिलेली ही बस आता आठवणीतच राहणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सध्या बेस्टच्या ताफ्यात केवळ 254 स्वतःच्या बसगाड्या उरल्या आहेत. बाकीच्या सर्व बसगाड्या भाडेतत्त्वावर चालवल्या जात आहेत. एकेकाळी हजारोंच्या संख्येने मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या लाल बेस्ट बस आता हळूहळू कमी होत चालल्या आहेत. आणि याच मालिकेतली एक म्हणजे गोराई आगारातील अशोक लेलँड कंपनीची सीएनजी बस क्रमांक 1942, जिने आता मुंबईकरांचा निरोप घेतला आहे.
बेस्ट’च्या ताफ्यातून आणखी एक बस बाद ; मुंबईकरांची लाडकी बेस्ट बस 1942  झाली इतिह
बेस्ट’च्या ताफ्यातून आणखी एक बस बाद ; मुंबईकरांची लाडकी बेस्ट बस 1942  झाली इतिह
advertisement

ही बस जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजना (JNNURM) अंतर्गत 2009 साली बेस्टच्या ताफ्यात दाखल झाली होती. त्यावेळी या योजनेअंतर्गत बेस्टला 750 विना वातानुकूलित (नॉन एसी) बसगाड्या मिळाल्या होत्या. सध्या मात्र मुंबईत वातानुकूलित (एसी) बसगाड्यांचा वापर वाढत चालल्याने या जुन्या नॉन एसी बसगाड्या हळूहळू सेवेतून बाहेर पडत आहेत

'1942’ बसचा निरोप सोहळा

advertisement

'1942’ ही बस अनेक वर्षं “सुरक्षितता हेच आमचं ध्येय” या ब्रीदवाक्यासह मुंबईच्या रस्त्यांवर धावत राहिली. या बसच्या निरोपानिमित्ताने ‘आपली बेस्ट आपल्यासाठी’ या संस्थेने आणि बेस्टप्रेमी नागरिकांनी मिळून एक विशेष निरोप सोहळा आयोजित केला. सकाळी गोराई आगारातून बस क्रमांक '1942' मधून प्रवास सुरू झाला आणि या बसने वांद्रे-वरळी सागरी सेतू व नव्याने तयार झालेल्या कोस्टल रोड मार्गे दक्षिण मुंबई गाठली.

advertisement

याप्रवासादरम्यान बसने गेटवे ऑफ इंडिया, कुलाबा आणि बॅकबे यांसारख्या अनेक प्रतिष्ठित स्थळांना भेट दिली. हा प्रवास म्हणजे जणू तिच्या दीर्घ सेवेला दिलेला शेवटचा सलामच होता. बस चालक आणि कर्मचाऱ्यांसाठी ही क्षण अत्यंत भावनिक होते. “ही बस आमच्यासाठी केवळ वाहन नव्हती, तर आयुष्याचा भाग होती. रोज इंजिन सुरू करताना जणू एखादा मित्र भेटतोय असं वाटायचं,” असं एका कर्मचाऱ्याने सांगितलं.

advertisement

बेस्ट वाचवणं म्हणजे मुंबईची ओळख जपणं

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
संध्याकाळची परंपरा मोडीत निघणार, मुहूर्त ट्रेडिंग दुपारीच होणार, वेळ काय?
सर्व पहा

आपली बेस्ट आपल्यासाठी’ संस्थेचे रुपेश शेलटकर म्हणाले, “मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीचं जाळं बेस्टपासून सुरू होतं. पण निधीअभावी आणि चुकीच्या धोरणांमुळे बेस्टचा सुवर्णकाळ मागे पडत चाललाय. बेस्ट वाचवणं म्हणजे मुंबईचं अस्तित्व वाचवणं आहे.” आज ‘1942’ बस काळाच्या पडद्याआड गेली असली, तरी तिच्या लाल रंगात दडलेला इतिहास, आवाजातली ओळख आणि चाकांवर फिरणाऱ्या आठवणी या सर्व गोष्टी मुंबईकरांच्या मनात कायम राहतील.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Best Bus : 83 वर्षांची साथ सुटणार... मुंबईकरांची लाडकी बेस्टची एक बस होणार इतिहास जमा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल