ईव्हीएमबाबत राहुल गांधींच्या ट्विटवर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, “ज्या बातम्या आजूबाजूला येत आहेत त्या चुकीच्या आहेत. ईव्हीएमसाठी कोणत्याही ओटीपीची आवश्यकता नाही. फक्त रिझल्ट बटण दाबून काम होते. "निवडणूक आयोगाने ईव्हीएमबाबतच्या संपूर्ण प्रक्रियेचे पालन केलं आहे."
स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क यांनी ईव्हीएमच्या वापरावर प्रश्न उपस्थित केले असून ते थांबवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसनेही ईव्हीएमवर निशाणा साधला. पक्षाचे खासदार राहुल गांधी म्हणाले की, ईव्हीएम हा एक 'ब्लॅक बॉक्स' आहे, ज्याला तपासण्याची परवानगी कोणालाही नाही. ते म्हणाले की भारताच्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत 'गंभीर चिंता' व्यक्त केली जात आहे.
advertisement
अधिकारी पुढे म्हणाले, “आम्ही काही लोकांना डेटा अपलोड करण्यासाठी मोबाईल फोन घेऊन जाण्याची परवानगी दिली होती. मात्र तो मोबाईल संबंधित व्यक्तीपर्यंत कसा पोहोचला, याबाबत आम्ही स्वत: एफआयआर दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. न्यायालयाचा आदेश असल्याशिवाय कोणालाही सीसीटीव्ही मिळणार नाही.
वाचा - EVM, मोबाईल अन् ओटीपी, वायकर प्रकरणात नेमकं काय झालं? निवडणूक आयोगाने सांगितलं
राहुल गांधी यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले आहे की, "जेव्हा संस्थांमध्ये जबाबदारी नसते, तेव्हा लोकशाही दिखावा होते आणि हेराफेरीची शक्यता वाढते." या पोस्टसोबतच गांधींनी एक बातमी देखील शेअर केली होती, ज्यामध्ये दावा करण्यात आला होता की मुंबईच्या उत्तर-पश्चिम लोकसभा जागेवरून 48 मतांनी विजयी झालेल्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या नातेवाईकाकडे एक फोन होता, ज्यामध्ये ईव्हीएम छेडछाड शक्य असल्याचा दावा करण्यात आलाय.
माजी काँग्रेस अध्यक्षांनी इलॉन मस्कची 'X' वर पोस्ट शेअर केली होती, ज्यात मस्कने ईव्हीएम काढून टाकण्याबद्दल बोलले होते. मस्क यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, “आपण ईव्हीएम रद्द केले पाहिजे. "मानव किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) द्वारे हॅक होण्याचा धोका, जरी लहान असला तरीही खूप जास्त आहे."