या प्रकरणी मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, माहीम येथील एल जे मार्गावर असलेल्या डॉमिनोज पिझ्झा कबुतखाना आणि हिंदुजा रुग्णालयाजवळील कबुतखाना येथे अज्ञात व्यक्तीने कबुतरांना दाणे टाकले व तो निघून गेला. ही बाब पालिका कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने पोलीस तक्रार केली. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रणाच्या मदतीने कबुतरांना दाणे टाकणाऱ्या व्यक्तीच्या वाहनाचा क्रमांक मिळवला असून त्याचा शोध सुरू आहे.
advertisement
Dadar Kabutarkhana: मुंबईत मध्यरात्री आलं पालिकेचं पथक, पण जमाव ऐकेना, नेमकं काय घडलं?
कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर मुंबई हाय कोर्टाने शहरातील कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश राज्य सरकारला आणि महानगरपालिकेला दिले होते. मात्र, हा पक्ष्यांवर अन्याय असून चारा-पाण्याविना त्यांचा मृत्यू होण्याची भीती आहे. त्यामुळे कबुतरांना खाद्य घालण्यापासून रोखू नये, अशी मागणी करणाऱ्या नागरिकांचा एक गट देखील कोर्टाच्या निर्णयाला विरोध करत आहे.
दादरच्या कबुतरखान्यावर सीसीटीव्हीची नजर
दरम्यान, शुक्रवारी (1 ऑगस्ट) मध्यरात्री महानगरपालिकेचं एक पथक दादर येथील कबुतरखाना हटवण्यासाठी दाखलं झालं होतं. या पथकाने कबुतरखान्यातील पत्रे, पिंजरे आणि इतर साहित्य हटवण्यास सुरुवात केली होती. मात्र, काही वेळातच स्थानिकांनी विरोध करत घोषणाबाजी केली आणि कारवाई थांबवण्याची मागणी केली. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सध्या या कबूतरखान्यावर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे.