ऑफर किती दिवसांसाठी मर्यादित...?
एअर इंडियाची ही ऑफर 12 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत प्रवाशांसाठी आहे. तिकीट बुकिंगची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर आहे. प्रवाशांनी या ऑफरचा लाभ घेण्यासाठी 'FLYAIX' हा प्रोमो कोड वापरणे आवश्यक आहे.
देशांतर्गत प्रवासासाठी 'Xpress Lite' श्रेणीत तिकिटे 1,200 रुपयांपासून सुरू होतात, यामध्ये चेक-इन बॅगेजची सुविधा नाही. 'Xpress Value' श्रेणीत 1,300 रुपयांपासून तिकिटे उपलब्ध असून यात काही अतिरिक्त सुविधा मिळतात. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी 'लाइट' श्रेणीची तिकिटे 3,724 रुपयांपासून आणि 'व्हॅल्यू' श्रेणीची तिकिटे 4,674 रुपयांपासून आहेत.
advertisement
">http://
विशेष म्हणजे, एअर इंडिया एक्सप्रेसच्या मोबाईल अॅपद्वारे तिकिटे बुक केल्यास कोणतेही सुविधा शुल्क आकारले जात नाही. चेक-इन बॅगेजच्या बाबतीतही विशेष सवलत आहे. देशांतर्गत प्रवासासाठी 15 किलोपर्यंत बॅगेज फक्त 1,500 रुपयांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी 20 किलोपर्यंत बॅगेज 2,500 रुपयांमध्ये दिले जाते, जे सामान्य दरांपेक्षा खूप कमी आहेत.
बिझनेस क्लास प्रवाशांसाठी 20% सूट, अधिक लेगरूम, मोफत गरम जेवण, प्राधान्याने बोर्डिंग आणि बॅगेज सेवा मिळेल. एअरलाइनच्या 40 पेक्षा जास्त नवीन बोईंग 737-8 विमानांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, सशस्त्र दलातील सदस्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठीही खास सवलती आहेत.
एअर इंडिया एक्सप्रेसने EMI आणि ‘Buy Now, Pay Later’ पेमेंट सुविधा सुरू केल्या आहेत. मास्टरकार्ड डेबिट किंवा क्रेडिट कार्डने तिकीट खरेदी केल्यास देशांतर्गत बुकिंगवर 250 रुपयांची आणि आंतरराष्ट्रीय बुकिंगवर 600 रुपयांची अतिरिक्त सूट मिळते. याशिवाय दिल्ली आणि बंगळुरूहून उदयपूर आणि जोधपूरसाठी थेट उड्डाणे सुरू झाली आहेत, जे प्रवाशांसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहेत. ही ऑफर प्रवाशांना स्वस्त आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव देण्यासाठी आहे.