कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गणपती स्पेशल मोदी एक्स्प्रेस ही विशेष रेल्वे सेवा गेल्या 12 वर्षांपासून सुरू आहे. यंदा ही सेवा खास असून गणेशभक्तांसाठी दोन ट्रेन धावणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोकणातील जनतेने भारतीय जनता पार्टी आणि राणे कुटुंबाला भरभरून दिले आहे. कणकवली, देवगड आणि वैभववाडीच्या जनतेने तिसऱ्यांदा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले. त्यामुळे यंदा कोकणवासीयांसाठी 2 विशेष ट्रेन सोडणार असून भक्तांसाठी मोफत जेवण आणि पाण्याची व्यवस्था केल्याचेही राणे यांनी सांगितले.
advertisement
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर 23 ऑगस्टपासून बंदी, या वाहनांना प्रवेश नाही!
वेळापत्रक काय?
मोदी स्पेशल एक्स्प्रेस ही 23 आणि 24 ऑगस्ट 2025 या दोन दिवशी सकाळी 11 वाजता दादर रेल्वे स्थानकावरून सुटणार आहेत. या ट्रेनचे तिकीट वाटप सोमवारी 18 ऑगस्ट 2025 पासून सुरु होणार आहे. तिकिटासाठी नागरिकांनी आपापल्या मंडळ अध्यक्षांकडे नाव नोंदणी करावी लागणार आहे.
शनिवार 23 ऑगस्ट रोजी दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वरून सकाळी 11 वाजता मोदी एक्स्प्रेस सुटेल. ही ट्रेन रत्नागिरी आणि कुडाळला थांबेल. या गाडीचा अंतिम थांबा सावंतवाडी असेल. तसेच रविवार 24 ऑगस्ट रोजी दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वरून सकाळी 11 वाजता सुटणारी ट्रेन वैभववाडी आणि कणकवली येथे थांबेल.
दरम्यान, या डबल धमाका स्पेशल मोदी एक्स्प्रेसचा लाभ सर्व कोकणवासीयांना घ्यावा, असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.