TRENDING:

गणपती बाप्पाने नेसली साडी, विनायकाच्या या अवतारामागील नेमकी कथा काय, VIDEO

Last Updated:

श्री गणेशाची पूजा घराघरात केली जाते. श्री गणेशाला बुद्धीआणि समृद्धीची देवता मानले जाते. परंतु फार कमी लोकांना माहिती आहे की श्री गणेशाने स्त्री रूप का धारण केले होते. याबाबतची एक पौराणिक कथा आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रतिकेश पाटील, प्रतिनिधी
advertisement

मुंबई : मुंबईतील गिरगाव येथे खेतवाडी परिसरात दरवर्षी गणेश मंडळे गणपती बाप्पाला ढोलकी आणि त्यावर उभा असलेला गणपती अशा वेगवेगळ्या रूपात आणण्याचा प्रयत्न करतात. यावर्षी खेतवाडी तिसरी क्रॉस लाईन यांनी साडी नेसलेली गणेशमूर्ती आणली आहे. गणेशाचा फर्स्ट लूक समोर आल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला. नेटिझन्स म्हणाले की, 'तो गणपती आहे. त्याला गणपती असू द्या. शंकर, स्वामी, साईबाबा, देवी, राम का... देव हा वेगवेगळ्या रूपात चांगला दिसतो.' या वर्षीचा खेतवाडी गणपती हा दुसरा कोणी नसून गणपतीचा अवतार आहे, हे अनेकांना माहीत नाही.

advertisement

हा अवतार गणेशाची स्त्री रूपे विनायक म्हणून ओळखला जातो. नेमका विनायकी गणपतीच्या अवताराच्या मागची कहाणी काय आणि यासोबत विनायकी अवतार आणण्याचा मागचं कारण काय, याबाबत जाणून घेण्यासाठी लोकल18 च्या टीमने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून संवाद साधला.

श्री गणेशाची पूजा घराघरात केली जाते. श्री गणेशाला बुद्धीआणि समृद्धीची देवता मानले जाते. मात्र, फार कमी लोकांना माहिती आहे की, श्री गणेशाने स्त्री रुप का धारण केले होते. याबाबतची एक पौराणिक कथा आहे. श्री गणेशाच्या या अवताराला स्त्री-अवताराला विनायकी, गणेशानी, गणेश्वरी, गजमुखी ह्यासारख्या अनेक नावाने संबोधित केले जाते.

advertisement

गणपतीलाही 'विनायकी' अवतार का घ्यावा लागला ?

पुराणानुसार अंधक नावाचा एक राक्षस होता, जो माता पार्वतीला आपली पत्नी बनवू पाहत होता. त्यावेळी भगवान शिवशंकर यांनी अंधकावर हल्ला केला होता. पण जसजसे अंधकाचे रक्त जमिनीवर सांडत होते, तसतसे त्या रक्ताच्या थेंबापासून अनेक राक्षसी शक्तीचे निर्माण होत होते. अंधकाचे रक्त जमिनीवर सांडताच अनेक राक्षस निर्माण होऊ लागले. माता पार्वतीला हे उमगले की, प्रत्येक प्राणीमात्रामध्ये त्याच्या अवस्थेविरुद्धही एक शक्ती असते. म्हणजे पुरुषामध्ये ताकदीशिवाय एक स्त्रीशक्ती पण असते, जिच्यात करुणा आणि क्रोध या दोन शक्ती विराजमान असतात.

advertisement

वयाच्या एक्काहत्तरीत 251 ट्रेक सर करणारा अवलिया, पुण्यातील सेवानिवृत्त ग्रंथपालाची अनोखी कहाणी!

देवीला माहित होते की, अंधक चूक करतो आहे आणि आपल्या ताकदीचा अयोग्य वापर करत आहे. म्हणून देवी पार्वतीने प्रत्येक देवतेच्या स्त्रीशक्तीला आवाहन केले. त्यानंतर श्रीविष्णूच्या कृपेनें श्रीशंकराची शिवानी देवी, ब्रहमदेवाची ब्राह्मी देवी व विरभद्राची भद्रकाली देवी प्रकट झाली. देवी आपल्या दशावतारात राक्षसासमोर प्रकट झाली. या 10 अवतारांनी अंधक राक्षसाच्या राक्षसी शक्तींना मारण्यास सुरुवात केली. मात्र, अंधक राक्षसाचे रक्त वाहण्याचे थांबू शकले नाही. मग श्रीगणेशांनी स्त्री अवतार घेऊन राक्षसाशी युद्ध पारंभ केले. त्यांनी आपल्या सोंडेने अंधक राक्षसाचे सर्व रक्त गिळण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्या दुष्ट राक्षसाचे रक्त जमिनीवर सांडणार नाही, याची खबरदारी घेतली आणि अशा रीतीने अंधक राक्षसाचा समूळ नायनाट झाला व श्रीगणेशाच्या विनायकी अवताराचा उदय झाला. याचसाठी श्रीगणेशाची पूजा स्त्रीरुपात केली जाते.

advertisement

मराठवाड्यात याठिकाणी होणार पाऊस, शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी, महत्त्वाची माहिती

राजस्थान येथील रेरह याठिकाणी देवी विनायकीची एक मूर्ती सापडली होती. देवी विनायकीचे चित्ररुपी मंदिर ओरिसा राज्यात हिरापूर येथेही आहे. या मंदिरात 64 योगिनीमधील देवी विनायकी हे रुप पण अस्तित्वात आहे. या मंदिराव्यतिरिक्त 1300 वर्षे जुने तामिळनाडूमधील कन्याकुमारीत थानूमलायन मंदिर ही देवी विनायकीचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. या देवीच्या 4 हातात वेगवेगळी शस्त्रे आहेत. मुख्य म्हणजे या देवीचा चेहरा हुबेहूब श्रीगणेश यांच्यासारखाच आहे. भारताव्यतिरिक्त तिब्बत येथे श्रीगणेशाची पूजा स्त्री रुपात केली जाते. देवीच्या या रुपाला श्रीगणेशानी असे म्हटले जाते, अशी माहिती त्यांनी दिली.

मराठी बातम्या/मुंबई/
गणपती बाप्पाने नेसली साडी, विनायकाच्या या अवतारामागील नेमकी कथा काय, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल