पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरीतील एका हॉटेल व्यावसायिकाला २.५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. खंडणी न दिल्यास व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि त्याचे हॉटेल ताब्यात घेण्याचा कट रचला होता. हॉटेल व्यावसायिकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून डी. के. रावसह सर्व सात आरोपींना अटक केली होती.
advertisement
या प्रकरणात गँगस्टर डीके राव, अनिल सिंग, मिमित भुता आणि इतरांविरुद्ध बीएनएसच्या कलम ३०८(४), ६१(२), आणि ३(५) अंतर्गत डीसीबी सीआयडी गुन्हा क्र. ५९६/२०२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा खटला डीके राव, त्याचे सहकारी अनिल परेराव आणि इतराने तक्रारदाराला याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार असी धमकी दिली होती. याा प्रकरणी गँगस्टर डीके राव, अनिल सिंह ,मिमित भुताला अटक करण्यात आली असून उद्या शनिवारी कोर्टासमोर रिमांडसाठी हजर केला जाणार आहे.
कोण आहे डी.के.राव?
डी. के. राव याचं खरं नाव दिलीप मल्लेश वोरा (किंवा रवी मल्लेश वोरा) आहे, हा मुंबईतील कुख्यात गँगस्टर आणि छोटा राजनचा खास हस्तक म्हणून ओळखला जातो. त्याचा मोठा गुन्हेगारी इतिहास असून त्यात खंडणी, दरोडा आणि अन्य गुन्हेगारी कारवायांचा समावेश आहे. अलीकडील एका प्रकरणात, डी. के. राव आणि त्याच्या सहा साथीदारांना मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने (Anti-Extortion Cell) अटक केली आहे.
मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात तो छोटा राजनचा महत्त्वाचा सहकारी आणि 'राईट हॅन्ड' म्हणून ओळखला जातो. हा चोरी, लुटमार आणि नंतर खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी झाला. मुंबईतील व्यावसायिक आणि बिल्डर्सना धमकावून खंडणीचे रॅकेट चालवण्यात त्याचा हात होता.
याआधी त्याला विविध गुन्ह्यांखाली अनेकदा अटक झाली आहे. एकदा एका पोलीस एन्काउंटरमध्ये त्याला सात गोळ्या लागूनही तो वाचला होता. यापूर्वी २० वर्षांपर्यंत तो तुरुंगात होता आणि २०१७ मध्येही खंडणी प्रकरणात त्याला अटक झाली होती. डी. के. रावच्या अटकेनंतर, खंडणीच्या रॅकेटचा पुढील तपास मुंबई गुन्हे शाखा करत आहे.