नवरात्रीत देवी सजावटीसाठी दागिने, किंमत 100 रुपये, खरेदीसाठी मुंबईत हे ठिकाण
या प्रदर्शनात पारंपरिक भारतीय संस्कृतीला आधुनिकतेचा स्पर्श देणारी उत्पादने असलेली विविध वस्त्रे आणि वस्तू आहेत. महिलांसाठी खास साड्यांची आकर्षक रेंज या ठिकाणी पाहायला मिळते. इरकल, कांजीवरम, कोटन, ब्लॉक प्रिंट, डोला सिल्क आणि पैठणी अशा विविध प्रकारच्या साड्यांचा संग्रह ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. या साड्यांची किंमत 1000 रुपयांपासून सुरू होऊन 5000 रुपयांपर्यंत आहे.
advertisement
नवरात्रोत्सवात डीजे, लेझर लाईटवर बंदी, पोलिसांची आयोजकांना सूचना; नियमभंग करणार्यांवर कारवाई
त्याचबरोबर AD ज्वेलरीचा एक आकर्षक कलेक्शनही उपलब्ध आहे ज्याची किंमत 200 ते 1500 पर्यंत आहे. ड्रेस मटेरियलच्या विविध पर्यायांची किंमत 750 पासून सुरू होऊन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये उपलब्ध आहेत. पुरुषांसाठी कापडांच्या रेंजची किंमत 800 पासून सुरू होते तर होम डेकोर वस्त्रांची किंमत 200 पासून उपलब्ध आहे जी घराच्या सजावटीसाठी आदर्श ठरतील.
बदलापूरमध्ये हद्दीच्या वादामुळे रस्त्याची चाळण; नागरिक त्रस्त
खवय्यांसाठी खास दिवाळी फराळ, विविध प्रकारचे पेय आणि अनेक स्वादिष्ट खाद्यपदार्थ देखील या प्रदर्शनीत उपलब्ध आहेत. हे खाद्यपदार्थ ग्राहकांना आकर्षित करत आहेत आणि सणाच्या आनंदात भर घालतात.
घे भरारी एक्सहिबिशन हे एक उत्तम ठिकाण आहे जिथे सणाच्या सुमारास विविध प्रकारचे पारंपारिक आणि आधुनिक उत्पादने एका छताखाली मिळतील. या प्रदर्शनात जाऊन तुमच्या सणासुदीच्या खरेदीला एक वेगळं आकर्षण देणं विसरू नका.