TRENDING:

फ्रेशर्स आहात? सरकारी विभागात इंटर्नशिप करण्याची मोठी संधी; अर्ज प्रक्रिया अन् पात्रता जाणून घ्या एका क्लिकवर

Last Updated:

Government Internship India : डीआरडीओच्या HEMRL पुणे येथे 6 महिन्यांसाठी पेड इंटर्नशिपची संधी उपलब्ध आहे. इंजिनियरिंग आणि सायन्स पदवीधारकांसाठी 40 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सरकारी क्षेत्रात काम करण्याची संधी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात(DRDO)अंतर्गत हाय एनर्जी मटेरियल्स रिसर्च लॅबोरेटरी (HEMRL) येथे पेड इंटर्नशिपसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही इंटर्नशिप एकूण 6 महिन्यांसाठी असणार आहे.
News18
News18
advertisement

इंजिनियरिंग फ्रेशर्ससाठी आनंदाची बातमी

डीआरडीओकडून एकूण 40 इंटर्नशिप पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. केमिकल इंजिनियरिंग, फिजिक्स, कॉम्प्युटर इंजिनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग तसेच संबंधित शाखांमध्ये पदवी पूर्ण केलेल्या उमेदवारांना ही संधी मिळणार आहे. ही भरती एकूण 8 वेगवेगळ्या विभागांमध्ये केली जाणार आहे.

इंटर्नशिपसाठी अर्ज कसा कराल? 

इंटर्नशिपसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 5,000 रुपये मानधन दिले जाणार आहे. ही इंटर्नशिप HEMRL, सुतारवाडी, पुणे येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून करावी लागणार आहे. या इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2026 आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे.

advertisement

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम डीआरडीओच्या अधिकृत वेबसाइटवरून अर्जाचा नमुना (Application Form) डाउनलोड करावा. हा फॉर्म पूर्णपणे भरून त्यामध्ये नाव, आधार क्रमांक, शैक्षणिक माहिती नमूद करावी. त्यानंतर अर्जावर स्वतःची सही आणि पासपोर्ट साईज फोटो लावावा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तेलघाणा व्यवसाय कसा सुरू कराल? तेल काढण्याची प्रक्रिया कशी? किती येतो खर्च?
सर्व पहा

पूर्ण भरलेला अर्ज द डायरेक्टर, HEMRL, सुतारवाडी, पुणे(HR विभाग) या पत्त्यावर पोस्टद्वारे पाठवावा. इंजिनियरिंग आणि सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ही सरकारी संस्थेत काम करण्याची उत्तम संधी आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
फ्रेशर्स आहात? सरकारी विभागात इंटर्नशिप करण्याची मोठी संधी; अर्ज प्रक्रिया अन् पात्रता जाणून घ्या एका क्लिकवर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल