TRENDING:

Bank Jobs : संधीचे सोने करा! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 600 पदांसाठी मोठी नोकरीची भरती; अर्ज करण्याची सोपी पद्धत येथे पहा

Last Updated:

Bank of Maharashtra Recruitment 2026 : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ग्रॅज्युएशन पूर्ण केलेल्या तरुणांसाठी ही उत्तम संधी असून कोणतीही परीक्षा न देता मेरिटच्या आधारे निवड होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आहे आणि तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अप्रेंटिस पदासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 600 पदे भरली जाणार आहेत. यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार आजपासून अर्ज करू शकतात.
News18
News18
advertisement

तरुणांसाठी सरकारी बँकेत नोकरीची उत्तम संधी

अप्रेंटिसशिप म्हणजे प्रत्यक्ष कामावर आधारित प्रशिक्षण. या काळात उमेदवारांना बँकेत काम करण्याची संधी दिली जाते आणि बँकेतील दैनंदिन कामकाज कसे चालते याचे सविस्तर प्रशिक्षण दिले जाते. ही अप्रेंटिसशिप साधारणपणे 6 महिने ते 1 वर्ष कालावधीसाठी असते. या काळात मिळणारा अनुभव पुढील नोकरीसाठी खूप फायदेशीर ठरतो. अप्रेंटिसशिप पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना इतर बँका किंवा संस्थांमध्ये काम करण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

advertisement

बँक ऑफ महाराष्ट्रमधील या अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2026 आहे. या भरतीसाठी 20 ते 28 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे या नोकरीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड मेरिटच्या आधारावर केली जाणार आहे.

आवश्यक पात्रता काय?

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला स्थानिक भाषा येणे गरजेचे आहे. उमेदवाराने 10 वी आणि 12 वीचे शिक्षण स्थानिक भाषेतून पूर्ण केलेले असावे आणि त्याची मार्कशीट उपलब्ध असावी.

advertisement

अर्ज कसा करावा?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात मोठी उलथापालथ, कांदा आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम bankofmaharashtra.bank.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. तेथे नवीन रजिस्ट्रेशन करा आणि नंतर लॉग इन करा. त्यानंतर अर्जाचा फॉर्म काळजीपूर्वक भरा. आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि सही अपलोड करा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी त्याचा प्रिंटआउट काढून ठेवणे विसरू नका.

मराठी बातम्या/मुंबई/
Bank Jobs : संधीचे सोने करा! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 600 पदांसाठी मोठी नोकरीची भरती; अर्ज करण्याची सोपी पद्धत येथे पहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल