नवीन भुयारी मार्गांमध्ये एक मार्ग भुलाबाई देसाई मार्गावरील आकृती पार्किंग इमारतीजवळ भुयारी मार्ग क्रमांक 2 आहे. तर दुसरा मार्ग खान अब्दुल गफार खान मार्गावर स्थित कर्णाक सिंधू इमारतीजवळील भुयारी मार्ग क्रमांक 12 आहे. या दोन नवीन मार्गांच्या उद्घाटनामुळे, नागरिकांना आता कोस्टल रोडवरील वर्दळीच्या भागांत सुरक्षितपणे आणि सोयीने पादचारी मार्गावर मार्गक्रमण करण्याची सुविधा मिळेल.
advertisement
हे 4 भुयारी पादचारी मार्ग पूर्वीच खुले
पूर्वीपासूनच खुल्या करण्यात आलेले चार भुयारी मार्ग म्हणजे भुलाबाई देसाई मार्गावरील आकृती पार्किंग इमारतीजवळ भुयारी मार्ग क्रमांक 4, वत्सलाबाई देसाई चौक (हाजी अली जंक्शन) येथील भुयारी मार्ग क्रमांक 6, खान अब्दुल गफार खान मार्गावरील वरळी दुग्ध शाळेसमोरील भुयारी मार्ग क्रमांक 11 आणि वरळीतील बिंदुमाधव ठाकरे चौकातील भुयारी मार्ग क्रमांक 14 आहेत.
या नवीन पादचारी भुयारी मार्गांच्या उद्घाटनामुळे मुंबईतील पादचाऱ्यांसाठी अधिक सुरक्षित आणि आरामदायक वातावरण तयार होईल. यामुळे कोस्टल रोडवरील पादचारी तसेच वाहनचालकांना एकमेकांची जागा ओळखून योग्य प्रकारे मार्गक्रमण करता येईल. तसेच या माध्यमातून वर्दळीच्या भागात दैनंदिन प्रवाशांची सुरक्षा आणि सोय यावर अधिक लक्ष केंद्रित करता येणार आहे.