Mumbai Water: मुंबईकरांसाठी खूशखबर! धरणे तुडुंब, ऑगस्ट 2026 पर्यंत पाण्यासाठी नो टेन्शन!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Mumbai Water: मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. ऑगस्ट 2026 पर्यंत पाण्याची चिंता मिटली असून मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
मुंबई: मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. यंदा सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने काही काळ पाणीटंचाईची भीती व्यक्त करण्यात येत होती. आता मात्र सगळ्या चिंता दूर झाल्या आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्व प्रमुख तलाव तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा, भातसा, अप्पर वैतरणा, तसेच तुळशी आणि विहार हे सप्टेंबर अखेरीस जवळपास काठोकाठ भरलेले आहेत. सध्या या सर्व तलावांमध्ये एकूण 14 लाख 40 हजार 220 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे आता थेट ऑगस्ट 2026 पर्यंत पाण्याची चिंता मिटली आहे, असे महापालिकेच्या एका वरिष्ठ अभियंत्याने सांगितले.
मुंबईला दररोज सरासरी 3,950 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. यामध्ये मुंबईसह ठाणे आणि भिवंडीच्या काही भागांचाही समावेश आहे. एका महिन्याचा पाणीपुरवठा साधारणत 1 लाख 20 हजार दशलक्ष लिटर एवढा असतो. सध्या साठवलेला पाणीसाठा कोणतीही कपात न करता किमान 11 महिने पुरवठा करण्यास सक्षम आहे. त्यामुळे येत्या काळात पाणीटंचाईसारखी परिस्थिती उद्भवणार नाही, असा दिलासा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
advertisement
2024 च्या तुलनेत यंदा 23 हजार दशलक्ष लिटर जास्त पाणी साठवले गेले आहे. हा अतिरिक्त साठा आगामी महिन्यांत पावसाची अनिश्चितता असतानाही मुंबईला सुरळीत पाणीपुरवठा करेल. विशेष म्हणजे तलावांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे हा साठा अधिक भरवशाचा ठरतो आहे.
advertisement
या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना आता पाण्याच्या उपलब्धतेबाबत चिंता करण्याची गरज नाही. महापालिकेच्या पाणी अभियंत्यांनी स्पष्ट केले की, “ऑगस्ट 2026 पर्यंत कोणतीही पाणी कपात अथवा टंचाईची शक्यता नाही.” पावसाळ्याच्या अर्धवट सुरुवतीनंतरही झालेला समाधानकारक साठा हे जलव्यवस्थापनाचे यश मानले जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 24, 2025 11:49 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Water: मुंबईकरांसाठी खूशखबर! धरणे तुडुंब, ऑगस्ट 2026 पर्यंत पाण्यासाठी नो टेन्शन!