TRENDING:

Mhada Homes : मुंबईकरांसाठी गुड न्यूज; म्हाडाच्या 2030 घरांची सोडत जाहीर, असा करा अर्ज!

Last Updated:

मुंबईमध्ये घर घेण्याचं स्वप्न बघणाऱ्यांसाठी म्हाडाने 2030 घरांची सोडत जाहीर केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबईमध्ये घर घेण्याचं स्वप्न बघणाऱ्यांसाठी म्हाडाने 2030 घरांची सोडत जाहीर केली आहे. मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड या भागातील हनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेला 9 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजेपासून सुरूवात होणार आहे. या सोडतीची जाहिरात 8 ऑगस्ट 2024 रोजी राज्यातील विविध वृत्तपत्रांमध्ये तसेच म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मुंबईकरांसाठी गुड न्यूज; म्हाडाच्या 2030 घरांची सोडत जाहीर, असा करा अर्ज!
मुंबईकरांसाठी गुड न्यूज; म्हाडाच्या 2030 घरांची सोडत जाहीर, असा करा अर्ज!
advertisement

सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याची लिंक दुपारी 12 वाजेपासून उपलब्ध राहील. तसेच नोंदणीकृत अर्जदार देखील ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत 4 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. तसेच ऑनलाईन अनामत रकमेची स्विकृती 4 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत केली जाणार आहे. सोडतीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी 9 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी दिनांक 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत केली जाणार आहे. प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत दिनांक 13 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता काढण्यात येणार असून सोडतीचे ठिकाण लवकरच जाहीर केले जाणार आहे.

advertisement

2024 च्या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी (Economically Weaker Section) 359 सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी (Lower Income Group) 627 सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी (Middle Income Group) 768 सदनिका, उच्च उत्पन्न गटासाठी (Higher Income Group) 276 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडाच्या मुंबई मंडळाने बांधलेल्या 1327 सदनिका, विकासकांकडून गृहसाठा म्हणून म्हाडाला प्राप्त 370 सदनिका (नवीन व मागील सोडतीतील सदनिका) आणि मागील सोडतीतील विविध वसाहतीतील विखुरलेल्या 333 सदनिकांचा समावेश आहे.

advertisement

असा करा अर्ज

गूगल ड्राइव्हच्या प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरमध्ये Mhada Housing Lottery System या नावे मोबाइल अॅप उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. तसेच अर्जदारांच्या सोयीकरिता https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील अर्ज नोंदणी, अर्ज भरणा आणि पेमेंट प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात मोठी उसळी, कांद्याने केली आजही निराशा, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

या सोडतीमध्ये समाविष्ट होण्याकरिता अत्यल्प उत्पन्न गटासाठी रुपये 6 लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे. अल्प उत्पन्न गटासाठी रुपये 9 लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी रुपये 12 लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे. उच्च उत्पन्न गटासाठी रुपये 12 लाखांहून अधिक वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्यांचा समावेश असेल.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mhada Homes : मुंबईकरांसाठी गुड न्यूज; म्हाडाच्या 2030 घरांची सोडत जाहीर, असा करा अर्ज!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल