ठाणे : सोन्या चांदीचा भाव हा सामान्य लोकांचा आवडीचा विषय आहे. त्यातच आता सामान्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. काल केंद्रीय अर्थसंकल्पात सादर केल्याप्रमाणे सोन्या आणि चांदीच्या भावांमध्ये घसरण झाली. केंद्रीय अर्थसंकल्पात कस्टम ड्युटी वरचे भाव कमी केल्यामुळे सोन्याचे भाव घसरले आहेत.
ज्यांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल ते आता सोने खरेदी करुन त्यात गुंतवणूक करू शकतात. मुंबईमध्ये कालपर्यंत 72,400 इतका सोन्याचा भाव होता. कस्टम ड्युटीचे भाव केल्याने हा भाव आज 68,700 इतका झाला आहे. म्हणजे एकूण 3,700 रुपयांनी सोन्याचा भाव कमी झाला आहे.
advertisement
'सोने आणि चांदीचा भाव कमी झाल्यामुळे आता सामान्य लोक सोन्याकडे गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहू शकतात. आम्ही गेले अनेक वर्ष सरकारकडे कस्टम ड्युटी कमी करण्यासाठी विनवणी करत होतो. उशिरा का होईना पण सरकारने आमची मागणी मान्य केली आणि आता यामुळे सामान्यांना त्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. गुंतवणूक म्हणून बिस्कीट किंवा कॉइन हा पर्याय उत्तम ठरेल', असे दादरमधील के.व्ही. पेंडुरकर या ज्वेलर्स शॉपचे मालक अभिषेक पेंडुरकर यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आता त्यावर विरोधकांनी टिका केली तर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. तसेच हा अर्थसंकल्प जनसामान्यांच्या हिताचा असल्याचे म्हटले आहे.




