'या' पदांसाठी होणार भरती
या भरतीअंतर्गत ट्रेड फायनान्स ऑफिसर, नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर, डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेटर, सिस्टीम अॅडमिनिस्ट्रेटर, क्लाउड इंजिनियर, सायबर सिक्युरिटी ऑफिसर, डेटा प्रायव्हसी ऑफिसर आणि डेटा अॅनालिस्ट अशा विविध पदांसाठी भरती होणार आहे. यामध्ये सीए पदवीधरांसाठी एकूण 75 जागा राखीव आहेत.
अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
युको बँकेतील या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 13 जानेवारी 2026 पासून सुरू झाली असून इच्छुक उमेदवार 2 फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी www.uco.bank.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सविस्तर माहिती पाहता येईल.
advertisement
आवश्यक पात्रता कोणती?
या भरतीमध्ये एकूण 173 पदे भरण्यात येणार आहेत. प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. ट्रेड फायनान्स ऑफिसर पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि एमबीए आवश्यक आहे तसेच किमान एक वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. चार्टर्ड अकाउंटंट पदासाठी ICAI मधून सीए उत्तीर्ण असणे आवश्यक असून JMGS-I साठी एक वर्ष आणि MMGS-II साठी तीन वर्षांचा अनुभव अपेक्षित आहे. इतर पदांसाठी बीई, बीटेक, एमसीए किंवा संगणक विज्ञानाशी संबंधित पदवी आवश्यक आहे.
या नोकरीसाठी 20 ते 35 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. JMGS-I पदासाठी 48,480 ते 85,920 रुपये तर MMGS-II पदासाठी 64,820 ते 93,960 रुपये इतका मासिक पगार मिळणार आहे. यासोबतच डीए, घरभाडे भत्ता आणि वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहेत. उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, गटचर्चा आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
