सूडाच्या नादात हद्द ओलांडली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तक्रारीमागे मालमत्तेचा जुना वाद असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे या प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले आहे. पीडित 14 वर्षीय मुलाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत असे आरोप केले आहेत की, त्याचे 73 वर्षीय आजोबा आणि 70 वर्षीय आजी यांनी त्याचे केवळ लैंगिक शोषणच केले नाही तर त्यांना विरोध केल्यावर त्याला मारहाण केली आणि धमकी देऊन कोणालाही हे न सांगण्यास सांगितले.
advertisement
या आरोपांनुसार जुहू पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या गुन्हेगारी धमकी देणे आणि मारहाण करणे अशा कलमांचाही समावेश केला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार गेल्या बुधवारी दुपारी पीडित मुलगा रडत घरी आला, तेव्हा त्याने त्याच्या पालकांना ही घटना सांगितली. ज्यात त्याने आजी-आजोबांनी केलेल्या लैंगिक अत्याचाराला त्याने विरोध केला असता, दोघांनी त्याला मारहाण केली आणि दमदाटी केली. सध्या पीडित मुलावर आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू असूनजुहू पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी कसून तपास करत आहेत.
