25 जानेवारी रोजी 'पनिश माय रेपिस्ट' या हॅशटॅगसह पीडित तरुणीने तिच्या बाबतीत घडलेल्या या दुर्दैवी घटनेची माहिती देऊन न्यायाची मागणी केली. इतकंच नाही, तर इतर महिलांना सोशल मीडियावर चॅटिंग किंवा संवाद साधताना सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही या पीडित तरुणीने दिला आहे. तरुणीने सांगितलं, की ती हेतिक शाह आणि इतर काही मित्रांसोबत पार्टीला गेली होती. त्या वेळी तिने टकिलाचे काही शॉट्स घेतले आणि तिला नशा चढली.
advertisement
जाग आली तेव्हा तो बलात्कार करत होता
पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तिला जास्त दारू पाजली होती. त्या रात्री शाहने आपल्या ड्रिंकमध्ये काही तरी मिसळलं असावं, ज्यामुळे अस्वस्थ व्हायला झालं असावं, असा पीडित तरुणीला संशय आहे. तिने लिहिलं आहे, की 'मी रात्री उशिरा उठून पाहिलं, तेव्हा तो माझ्यावर बलात्कार करत होता आणि मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करूनही तो तेच करत राहिला. इतकंच नाही तर रागाच्या भरात त्याने मला तीन वेळा थप्पड मारली. त्यामुळे मी घाबरले आणि अस्वस्थ झाले.'
वाचा - प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बलात्कार, Video दाखवून धर्मांतरासाठी ब्लॅकमेल, झुबेरला अटक
पीडित मुलीच्या म्हणण्यानुसार, आरोपी हेतिक शाहने तिला धमकावलं होतं; पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने माफीही मागितली आणि जे झालं ते तिथेच सोडून दे असं सांगितलं. त्याने 'काहीच झालं नव्हतं' असं म्हटलं आणि नंतर तो बेपत्ता झाला, असं पीडितेने म्हटलंय. पीडितेने सांगितलं, की तिच्यावर अत्याचार होऊन 12 दिवस उलटले आहेत. तो अटकेपासून पळ काढत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणी आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला आहे. अशी माहितीदेखील समोर आली आहे. मुंबईत घडलेली ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
