Crime News : प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बलात्कार, Video दाखवून धर्मांतरासाठी ब्लॅकमेल, झुबेरला अटक
- Published by:Shreyas
- trending desk
Last Updated:
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बलात्कार करून धर्मांतरासाठी ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मुंबई : प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बलात्कार करून धर्मांतरासाठी ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गाझियाबादमधल्या क्रॉसिंग रिपब्लिक इथे राहणाऱ्या आणि नोएडातल्या सेक्टर 63 मध्ये काम करणाऱ्या तरुणीवर एका व्यक्तीने बलात्कार केला. आरोपीने या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि पीडितेवर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. यानंतर पीडितेने सेक्टर 63 पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपीला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी सेक्टर 63 पोलीस स्टेशन हद्दीतल्या एका कंपनीत काम करते. ती गाझियाबादेतल्या शनिबाजार चौकातील रहिवासी आहे. आरोपी जुबेर हादेखील त्याच परिसरात राहतो. पीडितेच्या तक्रारीनुसार, तिचं वय 20 वर्षं आहे आणि सुमारे पाच वर्षांपासून झुबेर तिच्या मागे लागला होता.
11 जानेवारी 2024 रोजी ती ऑफिसला जात असताना झुबेरने तिला ऑफिसपर्यंत सोडण्याचा प्रस्ताव ठेवला. तिने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्यासोबत गेली; मात्र ऑफिसऐवजी तो तिला जवळच्या हॉटेलमध्ये घेऊन गेला. हे हॉटेल बहलोलपूर पोलीस स्टेशन हद्दीत येते. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. पीडितेच्या भावाला याबाबत माहिती मिळताच त्याने हा व्हिडिओ डिलीट करण्याची मागणी झुबेरकडे केली.
advertisement
झुबेर आणि त्याच्या भावाने त्याला मारहाण केली. यानंतर आरोपी पीडित तरुणीवर धर्म परिवर्तन करण्यासाठी सतत दबाव आणत होता. झुबेर तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. या धमक्यांना कंटाळून पीडितेने पोलिसांत तक्रार केली.
तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी झुबेरला अटक केली आहे, अशी माहिती पोलीस स्टेशन प्रभारींनी दिली. हॉटेलमध्ये चित्रित केलेला व्हिडिओ मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
advertisement
आजकाल घडणाऱ्या काही घटनांमध्ये लग्नाचं आमिष दाखवून मुलींना पळवून नेलं जातं आणि नंतर प्रेमाच्या नावाखाली त्यांची फसवणूक केली जाते. अशा प्रकरणांमध्ये मुलीनं तिला पळवून नेणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलीस तक्रार केली तर दोषी आरोपीला कठोर शिक्षा होऊ शकते. या घटनेतल्या पीडितेने आरोपीविरोधात तक्रार दिल्याने पोलिसांना कारवाई करता आली आणि काही काळातच आरोपी गजाआड झाला. तरुणींनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता सारासार विचार करून रिलेशनशिप सुरू केली पाहिजे, असा सल्ला कायदेतज्ज्ञ देतात.
advertisement
Location :
Noida,Gautam Buddha Nagar,Uttar Pradesh
First Published :
January 27, 2024 8:29 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Crime News : प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बलात्कार, Video दाखवून धर्मांतरासाठी ब्लॅकमेल, झुबेरला अटक


