मुंबई : सध्या पारंपरिक लूकला इंडो वेस्टर्न टच कसा देता येईल, याकडे अनेकांचा कल वाढला आहे. यातच आता सध्या खणाच्य चोळीचा ट्रेंड आहे. आताच्या सणांमध्ये आपल्याला कॉन्ट्रास्ट ब्लाउस टाईप वेगवेगळा साड्यांसोबत हा परिधान करता येतो. यामध्ये तुम्हाला मुंबईत दीनानाथ मार्केट हे बेस्ट ठिकाण आहे. याठिकाणी फक्त 180 रुपयांमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचे खणाचे ब्लाऊज मिळेल.
advertisement
आपल्याकडे सगळ्यांनी पाहावे, आपल्या स्टाइलचे कौतुक व्हावे, असं प्रत्येकाला वाटते. पण त्यासाठी फॅशन ट्रेंड समजून घ्यायला हवेत. सध्या खणाचा फॅशन ट्रेंड आहे. ‘खणाची साडी किंवा ब्लाउज महाराष्ट्राच्या परंपरेचा एक भाग. वेगळ्या रंगाढंगात आता या खणांच्या ब्लाउस पिस पाहायला मिळत आहेत. त्यामूळे आजही अनेक ठिकाणी महिला खणाची चोळी म्हणजे ब्लाऊज वापरतात. याच खणाच वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही रंगाच्या साडीवर हे ब्लाउस पिस उठून दिसते.
हे खण पिस फक्त 180 रुपये मीटर प्रमाणे विले पार्लेमधील दीनानाथ मार्केट येथे मिळतात. यामधे आकर्षक रंगानुसार त्यांच्या मटेरियलमध्ये ही क्वालिटी जाणवते. आणि या खणाच्या पिसच आणखी एक वैशिष्ट म्हणजे याचे तुम्ही पारंपारीक किंवा इंडो वेस्टर्न पद्धतीनें ब्लाउस पिसही शिवू शकतात. उठीव काठच्या बॉर्डरने शिवलेले ब्लाउस हे रेखीव दिसतात. तर तुम्हालाही अशाप्रकारचे विविध व्हरायटीचे ब्लाऊस हवे असतील तर तुम्ही याठिकाणी नक्की भेट देऊ शकतात.