TRENDING:

BMC Election: मतदार ओळखपत्र सापडत नाहीये, चिंता सोडा; आयकार्ड नसेल तरी मतदान कसं करायचं?

Last Updated:

भारतीय निवडणूक आयोगाच्यानुसार, तुमचं मतदार ओळखपत्र हरवलं असेल तरीही तुम्ही निवडणुकीत मतदान करता येणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  राज्यभरात गुरुवारी 29  महानगरपालिकांच्या . निवडणुका पार पडणार आहेत. निवडणुकांच्या वेळी मतदार हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. प्रत्येक नागरिकाला मतदानासाठी मतदान वोटर आयडी असणं गरजेचं आहे. पण बऱ्याचदा असेही अनेक लोक आहेत, ज्यांच्याकडे अद्याप मतदान वोटर आयडी नाही किंवा अनेकांचे मतदान आयडी गहाळ झालेले असतात. तर अशा वेळी करावं काय? या विषयी जाणून घेऊया.
News18
News18
advertisement

मतदार ओळखपत्राशिवाय देखील करता येईल मतदान जर तुमचं मतदार ओळखपत्र हरवलं असेल तरी काळजी करण्याची गरज नाही. कारण मतदार ओळखपत्र नसतानाही तुम्ही यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत मतदान करू शकता. निवडणुकीत मतदान करण्यासाठी, प्रत्येक व्यक्तीकडे मतदार ओळखपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक फोटो ओळखपत्र असणं आवश्यक आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्यानुसार, तुमचं मतदार ओळखपत्र हरवलं असेल तरीही तुम्ही निवडणुकीत मतदान करू शकता.

advertisement

मतदार ओळखपत्र नसेल तर मतदान कसं करायचं?

मतदार ओळखपत्र नसेल तरीही तुम्ही निवडणुकीत मतदान करू शकता. यासाठी फक्त एक महत्त्वाची गोष्ट करणं गरजेचं आहे. ओळखपत्र नसलं तरी चालेल, पण अधिकृत मतदार यादीत तुमचं नाव असलं पाहिजे. जर तुमचं यादीत नाव असेल तर तुम्ही घरी येणाऱ्या निवडणूक स्लिपची प्रिंटआउट घेऊन जाऊन मतदान करू शकता. 4 जुलै 2025 च्या आदेशानुसार निश्चित केलेल्या १२ प्रकारच्या ओळखीच्या पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येईल, अशी माहिती महानगरपालिका आयुक्‍त

advertisement

भूषण गगराणी यांनी दिली आहे.

मतदार ओळखपत्र नसल्यास ग्राह्य धरले जाणारे 12 प्रकारचे पुरावे

  1.  भारताचे पारपत्र (पासपोर्ट)
  2.  आधार ओळखपत्र
  3. वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)
  4.  आयकर विभागाकडील पॅन ओळखपत्र (पॅन कार्ड)
  5. केंद्र शासन / राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम / स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना छायाचित्र (फोटो) सह दिलेली ओळखपत्रे
  6. advertisement

  7. राष्ट्रीयकृत बँका अथवा टपाल खात्‍यामधील खातेदाराचे छायाचित्र (फोटो) असलेले पासबूक
  8.  सक्षम प्राधिकाऱयाने छायाचित्रासह दिलेला दिव्यांग (अपंगत्वाचा) दाखला
  9.  राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील छायाचित्र असलेले ओळखपत्र (मनरेगा जॉब कार्ड)
  10.  निवृत्त कर्मचाऱ्यांची अथवा त्यांच्या विधवा / अवलंबित व्यक्तींची फोटो असलेली निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रे (उदा. पासबूक, प्रमाणपत्र इ.)
  11.  लोकसभा / राज्यसभा सचिवालय तसेच विधानसभा / विधानपरिषद सचिवालय यांनी आपल्या सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र
  12. advertisement

  13. स्वातंत्र्य सैनिकाचे छायाचित्र असलेले ओळखपत्र
  14.  केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे छायाचित्रासह कार्ड
  15. टॉप व्हिडीओज

    सर्व पहा
    Tata चा धमाका, आता Wagon R विकून टाका! CNG मिनी SUV आणली!
    सर्व पहा

मराठी बातम्या/मुंबई/
BMC Election: मतदार ओळखपत्र सापडत नाहीये, चिंता सोडा; आयकार्ड नसेल तरी मतदान कसं करायचं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल