पश्चिम रेल्वे मार्गावर 25 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबर दरम्यानच्या मध्यरात्री साडेचार तासांचा ब्लॉक असेल. याचा अप आणि डाऊन जलद मार्गावरील गाड्यांवर परिणाम होईल. मध्यरात्री 12.15 वाजल्यापासून पहाटे 4.45 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे, त्यामुळे रात्री उशिरा घरी परतणाऱ्या प्रवाशांना याचा त्रास होऊ शकतो.
ब्लॉकदरम्यान बोरिवली आणि अंधेरी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावरील सर्व गाड्या अप धीम्या मार्गावरून धावतील. तसंच काही गाड्या रद्द करण्यात येतील किंवा शेवटच्या स्थानकाआधीच काही गाड्यांचा प्रवास थांबेल.
मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचं काम सुरू आहे. त्यासाठी सोमवारी मध्यरात्रीपासून ब्लॉक घेण्यात आला. एकूणच 3 रात्रीच्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 25, 2024 9:07 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वे मार्गावर साडेचार तासांचा मेगाब्लॉक!