आता आरेहून बीकेसी गाठता येणार फक्त 22 मिनिटांत! अंडरग्राऊंड मेट्रोचं तिकीट किती?

Last Updated:

Mumbai's underground metro: आरे ते बीकेसीदरम्यानच्या सर्व स्थानकांचं काम आता पूर्ण होत आलंय. पहिल्या टप्प्यात 12.44 किलोमीटरच्या मार्गावर दररोज मेट्रोच्या 96 फेऱ्या धावतील.

अंडरग्राउंड मेट्रो प्रवासाचं स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकतं.
अंडरग्राउंड मेट्रो प्रवासाचं स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकतं.
मुंबई : आता मेट्रोसुद्धा खचाखच भरलेली असते. तरीसुद्धा हा गारेगार प्रवास करण्याचा आनंद काही निराळाच आहे. अतिशय जलद, शांत आणि सुखद असा हा प्रवास असतो. आता तर मुंबईकरांचं चक्क अंडरग्राऊंड मेट्रो प्रवासाचं स्वप्नही लवकरच पूर्ण होऊ शकतं.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांच्या माहितीनुसार, आरे ते बीकेसीदरम्यान मेट्रो-3 कॉरिडोर सेवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊ शकते. याद्वारे आरे ते बीकेसी हे अंतर केवळ 22 मिनिटांत पार करणं शक्य होऊ शकतं. सध्या या प्रवासासाठी जवळपास पूर्ण 1 तास लागतो. मेट्रो आरे, सिप्ज, एम आय डी सी, मरोळ नाका, CSMIA T2 (एअरपोर्ट), सहार रोड, CSMIA डोमेस्टिक एअरपोर्ट, सांताक्रूझ, विद्यानगरी, बीकेसी ही स्थानकं गाठेल.
advertisement
आरे ते बीकेसीदरम्यानच्या सर्व स्थानकांचं काम आता पूर्ण होत आलंय. मेट्रो 3 ही कुलाबा ते आरेदरम्यान 33.5 किलोमीटरची मार्गिका आहे. त्यात पहिला टप्पा हा आरे कॉलनी ते बीकेसीदरम्यान 12.44 किलोमीटरचा आहे. या पहिल्या टप्प्यात दररोज मेट्रोच्या 96 फेऱ्या धावतील. सकाळी 6.30 वाजल्यापासून रात्री 10.30 वाजेपर्यंत प्रवाशांना मेट्रोनं प्रवास करता येईल.
advertisement
प्रत्येक मार्गावर दर 6.30 मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असेल. कुलाबा ते आरेदरम्यान सर्व मार्गांवर सेवा सुरू झाल्यानंतर ही 6 मिनिटांची वेळ अवघ्या 3 मिनिटांवर येईल. पहिल्या टप्प्यातील प्रवासासाठी 10 ते 50 रुपये तिकीट दर असेल. संपूर्ण मार्गावरील प्रवासासाठी 70 रुपये मोजावे लागतील. 2025 पर्यंत या पूर्ण मार्गावरील सेवा सुरू करण्याच्या उद्देशानं काम सुरू आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
आता आरेहून बीकेसी गाठता येणार फक्त 22 मिनिटांत! अंडरग्राऊंड मेट्रोचं तिकीट किती?
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement