TRENDING:

Mumbai Crime: म्हाडाचं घर देण्याच्या नावाखाली तिघांना लाखोंचा गंडा, महिलेविरोधात गुन्हा दाखल

Last Updated:

पत्रकार कोट्यातून म्हाडाचे घर मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिघांची सुमारे साडेसहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: पत्रकार कोट्यातून म्हाडाचे घर मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिघांची सुमारे साडेसहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे सामान्य नागरिकांच्या पायाखालची जमिन नक्कीच सरकली असेल. चारकोप परिसरात घर लागल्याचा बनावट लॉटरी आयडी क्रमांक पाठवून एका 52 वर्षीय व्यक्तीची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी वाकोला पोलि‍सांनी पूनम पाटगावे नावाच्या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
MHADA Lottery: घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर! म्हाडाच्या 2000 हून अधिक घरांची सोडत; कधी आणि कोणत्या भागांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार?
MHADA Lottery: घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर! म्हाडाच्या 2000 हून अधिक घरांची सोडत; कधी आणि कोणत्या भागांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार?
advertisement

फसवणुकीच्या प्रकरणात मुंबईतल्या अंधेरीतील रहिवासी 52 वर्षीय रमेश सावंत यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. सावंत हे अंधेरी येथील एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. त्यांची पत्नी दीप्ती सावंत 2019 साली अंधेरी पश्चिमेतील सुशिला टेक्सटाईल कंपनीत काम करत असताना पूनम पाटगावे हिच्याशी तिची ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत पूनमने फेब्रुवारी 2024 मध्ये पत्रकार कोट्यातून म्हाडामध्ये घर मिळवून देण्याचे आमिष दाखवले. हे आमिषच रमेशला चांगलंच महागात पडलं आहे.

advertisement

पत्रकार कोट्यातून मिळणाऱ्या घराची किंमत 15 लाख असून तुम्हाला सुरूवातीला प्रत्येकी दीड लाख रूपये भरावे लागतील, असे पूनमने सांगितले. पूनमच्या सांगण्यावर विश्वास ठेवून रमेश सावंत, त्याचा मेव्हणा रोहन कदम आणि मित्र दीपक भगत यांनी आपले आवश्यक कागदपत्रे व्हॉट्स ॲपवर पाठवले. डॉक्युमेंट पाठवल्यानंतर मार्च 2024 मध्ये जोगेश्वरीतल्या एका हॉटेलमध्ये रमेशसोबत त्याच्या मेव्हण्यासह आणखी एकाने पूनमला एकूण 04.50 लाख रुपये रोख स्वरूपात दिले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
12 प्रकारचे पापड, 60 महिलांचा सहभाग, कल्पना यांनी उभारला व्यवसाय, 1 लाखांची कमाई
सर्व पहा

यानंतर म्हाडा घरासाठी जीएसटी म्हणून प्रत्येकी 60 हजार रुपये भरावे लागतील, असे सांगत पूनमने तिघांकडून एकूण 01.80 लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले. मात्र पैसे मिळाल्यानंतर ती सतत टाळाटाळ करू लागली. काही दिवसांनी चारकोप परिसरात घर लागल्याचे सांगून तिने बनावट लॉटरी आयडी क्रमांक व्हॉट्स ॲपवर पाठवले. त्या आयडींचे कोणतेही अधिकृत ऑनलाइन तपशील देण्यास तिने नकार दिल्याने तिघांना संशय आला. अखेर फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी महिलेचा शोध सुरू केला आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Crime: म्हाडाचं घर देण्याच्या नावाखाली तिघांना लाखोंचा गंडा, महिलेविरोधात गुन्हा दाखल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल