भारतीय पोस्ट खात्यामार्फत ग्रामीण डाक सेवक (GDS) पदासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ही भरती प्रक्रिया सुरू झाली असून देशभरात २५ हजारांहून अधिक पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांना यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. पोस्ट ऑफिसने काही दिवसांपूर्वीच या भरतीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. फक्त 10 वीच्या आधारावरच ही निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे देशातल्या अनेक तरूणांना या भरती प्रक्रियेमध्ये नोकरीसाठी ट्राय करता येणार आहे.
advertisement
ग्रामीण डाक सेवक (GDS) पदासाठीच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 20 जानेवारी 2026 पासून सुरू झाली असून 4 फेब्रुवारी 2026 ही तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारची मुलाखत घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड थेट 10 वीच्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्टद्वारे केली जाईल. यामध्ये विशेषतः गणित विषयातील गुणांना महत्त्व दिले जाणार आहे. अर्ज भरल्यानंतर शुल्क भरण्याची अंतिम तारीख 5 फेब्रुवारी २०२६ रात्री 11 वाजेपर्यंत असणार आहे. तर निवड झालेल्या उमेदवारांची मेरिट लिस्ट 20 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार दरमहा सुमारे 10,000 ते 29,480 रुपये इतके वेतन मिळणार आहे. त्यामुळे कोणतीही मुलाखत न देता सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक उत्तम संधी ठरणार आहे.
