कल्याण- डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विसर्जन स्थळांची माहिती गणेशभक्तांना आता एका क्लिकवर मिळणार आहे. https://mandap.singlewindowsystemkdmc.in/place/place या संकेतस्थाळावरून तुम्हाला माहिती मिळेल. केडीएमसी परिसरामध्ये जितकेही प्रभाग आहेत. त्या प्रभागामध्ये जितकेही कृत्रिम तलाव आहेत, त्यांची माहिती तुम्हाला या संकेत स्थळावर उपलब्ध होईल.
बाप्पाच्या नैवेद्यासाठी करा ओरिओ मोदक, लहान मुलं देखील आवडीने खातील
advertisement
महानगरपालिका क्षेत्रामध्ये 2025 या वर्षामध्ये तब्बल 52 हजाराच्या आसपास गणेश मुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आली आहे. तर 293 इतक्या सार्वजनिक गणेश मुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आली आहे. घरगुती गणपती आणि गौरीच्या विसर्जनाची योग्य सुविधा मिळावी, यासाठी केडीएमसीच्या वतीने सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची सुविधा ठिकठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. महानगरपालिका क्षेत्रात दीड, पाच, सात आणि दहा दिवसांच्या गणपतींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे गणपती विसर्जनासाठी निघालेल्या गणेशभक्तांची संध्याकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळेल, यामुळे शहरात वाहन कोंडीची समस्या निर्माण झालेली पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
यासोबतच सध्या कल्याण डोंबिवली क्षेत्रामध्ये पाऊसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळत आहे. पाऊसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पाहायला मिळत आहेत. खड्ड्यांमुळे रस्त्यावर संथ गतीने वाहतूक पाहायला मिळत आहे. या ट्रॅफिकवर तोडगा काढण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या चांगलंच नाकीनऊ येत आहे. ही परिस्थिती उद्भवू नये आणि भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी पहिल्यांदाच महानगरपालिकेने गणेश विसर्जनासाठी वेगळा प्रयोग अवलंबला आहे. यावर्षी गणरायाची प्रतिष्ठापना केलेल्या घरगुती गणेश भक्तांना आणि सार्वजनिक मंडळांना आपल्या गणेश मूर्तीचे विसर्जन करणे सोयीचे व्हावे, यासाठी "प्रभाग निहाय नैसर्गिक व कृत्रिम विसर्जन स्थळांची माहिती त्यांच्या गुगल मॅप" सहीत लिंकवर नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
परदेशात जाण्याचं स्वप्न अपूरं राहिलं, सुरू केला केक व्यवसाय, महिन्याला इतकी कमाई
लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला " प्रभाग, पत्ता, विसर्जन स्थळाचे नाव आणि गुगल मॅप" या स्वरुपात माहिती उपलब्ध होईल. यामुळे नागरिकांना आपले घर आणि मंडळा नजीकच्या विसर्जन स्थळी भक्तांना लाडक्या गणरायाचे विसर्जन करता येणार आहे. त्याचप्रमाणे यामध्ये परिसरातील वाहतुकीचे चित्र देखील स्पष्ट होत असल्यामुळे नागरिकांना विसर्जन स्थळ सुनिश्चित करणे सोयीचे होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या लिंकचा वापर करावा असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.