TRENDING:

नोकरदारांसाठी गुड न्यूज! PF आता UPIने काढता येणार, पैसे काढण्याची मर्यादा किती?

Last Updated:

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) संबंधित जोडलेल्या कर्मचाऱ्यांबाबत एक महत्त्वाची बातमी आहे. एप्रिल 2026 पासून, कर्मचारी UPI द्वारे EPF खात्यांतून पैसे काढू शकणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) संबंधित जोडलेल्या कर्मचाऱ्यांबाबत एक महत्त्वाची बातमी आहे. एप्रिल 2026 पासून, कर्मचारी UPI द्वारे EPF खात्यांतून पैसे काढू शकणार आहेत. ही सुविधा कर्मचाऱ्यांना भीम ॲपच्या (Bhim App) माध्यमातून मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना त्यांचे पीएफचे पैसे थेट UPI-लिंक्ड बँक खात्यात पाठवण्यात येणार आहेत. यामुळे PF काढण्याची प्रक्रिया पूर्वीपेक्षा सोपी, जलद आणि अधिक डिजिटल होईल. ज्या कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पोर्टलद्वारे पैसे काढण्यासाठी अडचण येत होती, त्यांना आता कोणतीही अडचण येणार नाहीये.
नोकरदारांसाठी गुड न्यूज! PF आता UPIने काढता येणार, पैसे काढण्याची मर्यादा किती?
नोकरदारांसाठी गुड न्यूज! PF आता UPIने काढता येणार, पैसे काढण्याची मर्यादा किती?
advertisement

सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2026 पासून EPFO सदस्य भीम ॲपद्वारे आपल्या PF खात्यामध्ये किती पैसे जमा आहेत, याची माहिती जाणून घेऊ शकणार आहेत. EPFO सदस्यांना त्यांच्या खात्यावर रकमेच्या 25% रक्कम ठेवणे आवश्यक असणार आहे. सुरूवातीला एकावेळी 25,000 रुपयांपर्यंत पैसे काढण्याची मर्यादा विचारात घेण्यात आली आहे. व्यवहारांचा गैरवापर रोखण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. या संपूर्ण व्यवस्थेसाठी EPFO, C-DAC आणि NPCI एकत्र काम करीत आहे. याशिवाय, स्टेट बँक ऑफ इंडिया सदस्यांच्या पेमेंट प्रोसेसवर लक्ष देणार आहे.

advertisement

UPI द्वारे पैसे काढण्यासाठी नियमित UPI व्यवहारांप्रमाणेच त्यासाठी नियम असणार आहेत. सेक्युरिटी आणि व्हेरिफिकेशन संबंधित सर्व नियम एक सारखेच राहणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ही सुविधा फक्त भीम ॲपवरच उपलब्ध असणार आहे. सुविधेसाठी ब्लू- कॉलर आणि असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक फायदा होण्याची अपेक्षा आहे. सध्या अनेक कर्मचाऱ्यांना EPFO च्या ऑनलाइन पोर्टल किंवा कागदपत्रांची प्रोसेस समजून घेण्यात अडचण येत आहे. यूपीआयद्वारे पैसे काढल्याने नोकरदारांना मोबाइल अॅपद्वारे सहजपणे पीएफ काढता येईल. अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना, जर वारंवार छोटी रक्कम काढलीत तर पैसे काढण्याची मर्यादा संपू शकते, असा इशारा देखील दिला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Tata ने आणली मायलेदार SUV, आता Maruti Wagon R पेक्षा आहे मजबूत अन् किंमतही कमी!
सर्व पहा

EPFO ने पैसे काढण्याची रक्कम निश्चित केली आहे. जर एखाद्या सदस्याने सलग दोन किंवा तीन वेळा पैसे काढले, जरी एकूण रक्कम मर्यादेत असली तरीही, मर्यादा गाठल्यानंतर पुढील पैसे काढणे शक्य होणार नाही. म्हणून, सदस्यांनी पैसे काढण्याच्या रकमेचा आणि आपण कितव्यांदा रक्कम काढतोय, याचा विचार केला पाहिजे.

मराठी बातम्या/मुंबई/
नोकरदारांसाठी गुड न्यूज! PF आता UPIने काढता येणार, पैसे काढण्याची मर्यादा किती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल