TRENDING:

Kokan : कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं, अनेक गाड्या उशिरा; चाकरमान्यांचे प्रचंड हाल

Last Updated:

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड स्थानकामध्ये प्लॅटफॉर्म वरील प्रवाशांना रेल्वेत शिरता आले नाही म्हणून रेल्वे मधील आणि प्लॅटफॉर्म मधील प्रवाशांमध्ये काही प्रमाणात धक्काबुक्की देखील झाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
चंद्रकांत बनकर, खेड, 24 सप्टेंबर : गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या लाखो चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मात्र कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या नियमित तसेच गणपती स्पेशल गाड्या या तीन ते चार तास तसेच काही गाड्या तब्बल सात तास उशिरा धावत आहेत. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक प्रवासी गाडीच्या वेळेनुसार प्लॅटफॉर्मवर आले असून त्यांना गाडी उशिरा असल्याचं समजल्याने आता अनेक तास वाट बघत बसावं लागत आहे. प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
News18
News18
advertisement

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड स्थानकामध्ये प्लॅटफॉर्म वरील प्रवाशांना रेल्वेत शिरता आले नाही म्हणून रेल्वे मधील आणि प्लॅटफॉर्म मधील प्रवाशांमध्ये काही प्रमाणात धक्काबुक्की देखील झाली. मंगला एक्सप्रेस काही संतप्त प्रवाशांनी थांबवण्याचा प्रयत्न देखील केला. आधीच्या स्थानकातून रेल्वे गाड्या खचाखच भरून आल्याने तसेच आत मधून दरवाजे बंद केल्याने खेड स्थानकातील प्रवाशांना आत मध्ये शिरता येत नसल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

advertisement

Konkan : चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासातही विघ्न, प्रचंड गर्दी; एक्सप्रेस अडवण्याचा प्रयत्न, पाहा PHOTO

मुंबईच्या दिशेने जाणारी मंगला एक्सप्रेसच्या इंजिन समोर उभा राहून काही संतप्त प्रवाशांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. या गर्दीमध्ये एक युवक अक्षरशः गुदमरल्याने त्याच्यावर स्थानकातच प्रथमोपचार करण्यात आले. आरपीएफ आणि रत्नागिरी पोलीस यांच्यामुळे कोणताही अनर्थ झाला नाही मात्र रेल्वे स्थानकात हजारो प्रवाशांची मोठी गर्दी आहे.

advertisement

उशिरा असलेल्या गाड्या

01152 मडगाव - सीएसटी, गणपती स्पेशल एक्सप्रेस , 4 तास 20 मिनिटं उशिरा

01166 मेंग्लोर जंक्शन - एलटीटी स्पेशल ट्रेन 7 तास 38 मिनिटं उशिरा

01592 मडगाव - सीएसटी स्पेशल ट्रेन 2 तास 30 मिनिटं उशिरा

09010 सावंतवाडी - मुंबई सेंट्रल गणपती स्पेशल ट्रेन 1 तास उशिरा

advertisement

09019 मडगाव उधना गणपती शेषल ट्रेन 3 तास उशिरा धावत आहे

10104 मडगाव - सीएसटी मांडवी एक्सप्रेस 2 तास 10 मिनिटं उशिरा

10106 सावंतवाडी - दिवा एक्सप्रेस 2 तास 30 मिनिटं उशिरा

12052 मडगाव - सीएसटी जनशताब्दी एक्सप्रेस 30 मिनिटं उशिरा

12620 मत्स्यगंधा एक्सप्रेस 30 मिनिटं उशिरा

16346 त्रिवेंद्रम - एलटीटी नेत्रावती एक्सप्रेस 3 तास उशिरा

advertisement

22120 मडगाव सीएसटी तेजस एक्सप्रेस 1 तास 7 मिनिटं उशिरा

मराठी बातम्या/मुंबई/
Kokan : कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं, अनेक गाड्या उशिरा; चाकरमान्यांचे प्रचंड हाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल