रो-रो सेवा का वापरली जाते?
सध्याची रो-रो सेवा ही धान्य, फळे, भाजीपाला, दैनंदिन उपयोगातील वस्तू आणि इतर अत्यावश्यक माल वाहतुकीसाठी सुरु आहे. यामुळे ट्रक रस्त्यावरून जाण्याऐवजी माल रेल्वेने वेगाने आणि सुरक्षितपणे वाहून नेला जाऊ शकतो. यासोबतच या सेवेमुळे वातावरणातील प्रदूषण कमी होते आणि त्यात इंधनाची बचत ही मोठ्या प्रमाणात कमी होते..
advertisement
'हा' केला महत्त्वपूर्ण बदल
पूर्वी रो-रो वॅगन साधारण 50 टन माल वाहून नेऊ शकत होती. पण, 50 टनपेक्षा जास्त वजन असलेले ट्रक या सेवेवर वाहतूक करू शकत नव्हते. आता कोकण रेल्वेने वॅगनची क्षमता वाढवून 57 टन केली आहे. यामुळे अवजड व्यावसायिक वाहनांची वाहतूक अधिक सोपी होणार आहे.
ही वाढलेली क्षमता मालवाहतुकीत कार्यक्षमता सुधारेल. अधिक वजनाचे ट्रक जलदपणे रेल्वे मार्गाने पाठवता येतील तसेच रस्त्यांवरील वाहतूक कमी होईल आणि मालवाहतुकीचा खर्चही कमी होईल.याचा थेट फायदा शेतकरी आणि इतर व्यवसायिकांना मिळणार आहे.
कोकण रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय मालवाहतुकीसाठी मोठे पाऊल ठरणा आहे. इतकेच नव्हे तर आता ही सेवा अधिक ट्रक आणि जास्त माल वाहू शकेल, ज्यामुळे देशभरातील व्यापार आणि स्थानिक वस्तूंचा पुरवठा सोपा होईल.
